लवकरच नव्या अवतारात येतेय मारुती सुझुकी S-Cross; पाहा डिटेल्स | Maruti Suzuki S-Cros Launch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Suzuki s cross

लवकरच नव्या अवतारात येतेय मारुती सुझुकी S-Cross; पाहा डिटेल्स

मारुती सुझुकी लवकरच आपली प्रीमियम क्रॉसओवर कार मारुती सुझुकी एस-क्रॉस (Maruti Suzuki S-Cross) नवीन अवतारात लॉन्च करू शकते. अलीकडेच नवीन मॉडेलचे फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, S-Cross ही येत्या 25 नोव्हेंबरला बाजारात लॉन्च होईल. फोटोवरुन असे दिसते की या क्रॉसओवरला SUV सारखा एलिव्हेटेड लुक दिला जाऊ शकतो. याशिवाय आणखी कोणते बदल होणार आहेत, चला जाणून घेऊया..

नवीन जनरेशन मारुती सुझुकी एस-क्रॉस त्याच्या सेगमेंटमध्ये अने एडव्हांस फीचर्स देण्यात येऊ शकतात. यात पूर्वीपेक्षा जास्त विस्तीर्ण फ्रंट ग्रिल आणि बूमरँग स्टाइल फ्रंट एलईडी हेडलॅम्प्स मिळण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या फोटोनुसार मारुती सुझुकी एस-क्रॉसला 14-इंच क्रोम अलॉय व्हील्स, समोरच्या बंपरवरच साइड इंडिकेटर आणि सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडा चांगला ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.

तरूण खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी इंटीरियर आणि इंजिनमध्येही बदल दिसतील. मारुती सुझुकी एस-क्रॉस इंफोटेनमेंटसाठी डिजिटल टचस्क्रीन डिस्प्लेसह येऊ शकते. कारचे सुरक्षा फीचर्स सध्याच्या एस-क्रॉस सारखीच असू शकतात, त्यात थोडीशी भर पडली आहे.

हेही वाचा: Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

नवीन मारुती सुझुकी एस-क्रॉसमध्ये 1.5-लिटर K15B माईल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन असण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 103 bhp आणि 4,400rpm वर 138Nm पीक टॉर्क जनरेट करते. तेच इंजिन सध्याच्या मॉडेलमध्येही आहे. इंजिनला पाच-स्पीड मॅन्युअल आणि चार-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल.

हेही वाचा: मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

loading image
go to top