Maruti Suzuki Swift : आता आणखी पावरफुल होणार मारुती सुझुकी स्विफ्ट, लाँचपूर्वीच माहिती लीक

लाँच होण्याआधीच 2024 मारुती स्विफ्टच्या इंजिनची नवीन माहिती ऑनलाइन लीक झाली आहे
Maruti Suzuki Swift
Maruti Suzuki Swiftesakal

Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी स्विफ्ट लाँच झाल्यापासून कंपनीसाठी सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक ठरली आहे. हे मॉडेल पहिल्यांदा 2005 मध्ये लाँच करण्यात आले होते. ज्याचे थर्ड जनरेशन मॉडेल सध्या विकले जात आहे, जे 2017 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता त्याचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च होणार आहे.

मारुतीने न्यू जनरेशन स्विफ्टची चाचणी सुरू केली असून ती या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत दाखल होणार आहे. ही कार पुढील वर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, लाँच होण्याआधीच 2024 मारुती स्विफ्टच्या इंजिनची नवीन माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. चला तर नव्या इंजिनची खासियत जाणून घेऊया.

इंजिन कसे असेल?

नव्या स्विफ्टमधे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, नवीन स्विफ्टला नवीन 1.0-लीटर बूस्टरजेट इंजिनचा पर्याय देखील मिळेल. स्विफ्टला टर्बोचार्ज केलेले इंजिन मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. मारुतीचे 1.0 लीटर टर्बो इंजिन भारतात नवीन नाही. कंपनीने पहिल्यांदा ते 2017 मध्ये Baleno RS सह लॉन्च केले होते, परंतु नंतर कमी विक्रीमुळे ते बंद करण्यात आले. एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये अधिक शक्तिशाली इंजिनच्या मागणीमुळे, मारुती आपल्या कारमध्ये हे इंजिन देणार आहे.

Maruti Suzuki Swift
Maruti Suzuki Swift

होणार अधिक पावरफुल

1.0L बूस्टरजेट इंजिन भारतात असेम्बल केले आहे. हे 3-सिलेंडर इंजिन 100 PS पॉवर आणि 147.6 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. फ्रँक्स एसयूव्हीमध्येही हे इंजिन वापरण्यात येणार आहे. कारच्या युरोप मॉडेलमध्ये आधीच मोठे 1.4L बूस्टरजेट इंजिन आहे.

Maruti Suzuki Swift
Maruti Swift Mocca Cafe Edition : मारुती सुझुकी स्विफ्ट आता नवीन एडिशनमध्ये लाँच, फिचर्स अफलातून

कशी असेल अपकमिंग स्विफ्ट?

अपकमिंग 2024 मारुती स्विफ्ट हे या कारचे फोर्थ जनरेशन मॉडेल असेल. ज्याची चाचणी युरोप आणि जपानमध्ये सुरू झाली आहे. या नेक्स्ट जनरेशन स्विफ्टमध्ये सध्याचे सामान्य डिझाइन सिल्हूट उपलब्ध असेल, परंतु त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल केले जातील. याला नवीन क्लॅमशेल बोनेट मिळेल, जे त्याला स्क्वेअर-ऑफ आणि मस्क्यूलर लुक देईल. यासोबतच यात नवीन हेडलाइट्स आणि फ्रंट लुक पाहायला मिळणार आहे. (Maruti Suzuki)

यामध्ये नवीन रिअर डिझाइनही दिले जाऊ शकते. या कारच्या इंटीरियरमध्ये आणखी फीचर्स, टेक्नॉलॉजी आणि अपडेटेड सीट्स पाहायला मिळतील. याला 1.0L बूस्टरजेट आणि K12 1.2L 4-सिलेंडर इंजिन व्यतिरिक्त मजबूत-हायब्रिड 3-सिलेंडर, 1.2L पॉवरट्रेन मिळण्याची शक्यता आहे. त्याची हायब्रिड आवृत्ती 30 kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळवू शकते. त्याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते.

Maruti Suzuki Swift
Maruti Suzuki : 40 km चा मायलेज अन् खूप काही... Maruti Swift आणि Dzire चे नवीन अवतार बघितले का?

टाटा टियागोशी स्पर्धा करेल स्विफ्ट

या कारचे सध्याचे मॉडेल टाटा टियागोशी स्पर्धा करते, ज्यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. तसेच, त्यात सीएनजीचा पर्याय देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com