
NASA massive butterfly coronal hole Sun geomagnetic storms aurora
esakal
सूर्यावर ५ लाख किमी रुंदीचे फुलपाखरू आकाराचे कोरोनल होल दिसले, जे सौर वारे बाहेर सोडत आहे.
हे सौर वारे १४ सप्टेंबरला पृथ्वीवर येऊन भू-चुंबकीय वादळे निर्माण करू शकतात.
नासा या घटनेचे निरीक्षण करत असून, अंतराळ हवामानाचा अभ्यास करत आहे.
coronal hole Sun photo : नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने सूर्याच्या वातावरणात ५ लाख किलोमीटर रुंदीचे फुलपाखराच्या आकाराचे विशाल भगदाड पडल्याचे छायाचित्रित केले आहे. ११ सप्टेंबरला दिसलेल्या या अनोख्या घटनेने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले असून, यातून बाहेर पडणाऱ्या सौर वाऱ्यामुळे पृथ्वीवर १४ सप्टेंबरपर्यंत भू-चुंबकीय वादळ येण्याची शक्यता आहे.