Mercedes ची हॅचबॅक कार आहे देशात सर्वात वेगवान, जाणून घ्या फिचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mercedes-AMG A 45 S 4 MATIC+
Mercedes ची हॅचबॅक कार आहे देशात सर्वात वेगवान, जाणून घ्या फिचर्स

Mercedes ची हॅचबॅक कार आहे देशात सर्वात वेगवान, जाणून घ्या फिचर्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Mercedes-Benz ने एएमजी उत्पादन लाईन अंतर्गत नवी Mercedes-AMG A 45 S 4 MATIC+ लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे, की ही देशाची सर्वांत वेगवान हॅचबॅक कार आहे. केवळ ३.९ सेकंदात ती ०-१०० किमी गती घेते. तिची सर्वाधिक गती २७० किमी प्रतितास आहे. जाणून घ्या फिचर्स आणि किंमतीविषयी...

मॅटिक प्लसमध्ये कंपनीने ४ सिलिंडरचे टर्बोचार्ज इंजिन दिले आहे. कंपनी म्हणते, की ती जगातील सर्वात जास्त पाॅवरफुल टर्बोचार्ज इंजिन आहे. २.० लीटरचे हे पेट्रोल इंजिन ४२१ बीएचपीची कमाल पाॅवर आणि ५०० एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. कंपनीच्या या कारच्या लाँचिंगनंतर एएमजी लाईनमध्ये एकूण ५ कार झाल्या आहेत. मॅटिक प्लसचे एक्सटीरिअर कंपनीच्या इतर वाहनांप्रमाणे प्रीमियम लूकच्या आहेत. मात्र यात पहिल्यांदा कंपनीने काॅम्पॅट क्लास वाहनात एएमजीचे स्पेशल रेडिएटर ग्रिल दिले आहे. हिचे बोनट खूपच एअरोडायनामिक आहेत. ही कार मल्टिबीम एलईडी हेडलाईट, एलाॅय व्हिल आणि क्राम टचसह येते.

हेही वाचा: मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा

मर्सिडीजची हॅचबॅक कार मॅटिक प्लसचे इंटीरिअर खूप स्पोर्टी आहे. तिचे सीट्स स्पोर्टी आहेत आणि त्यांना लायनिंग ड्युअल टोन लूक देण्यात आले आहे. कारमध्ये ३ स्पोक स्टेअरिंग व्हिल, रेड कलरचे सीट बेल्ट आणि हाय एंड फिचर्स आहेत. दुसरीकडे एसी व्हेंट्सला प्रीमियम टच दिले गेले आहे. कंपनीने मॅटिक प्लसला ६ रंगांच्या व्हेरिएंट्समध्ये उतरवले आहे. सन येलो, पोलर व्हाईट, माऊंटन ग्रे, डिझाईनो पॅटोगोनिया रेड, डिझाईनो माऊंटन ग्रे मॅंगो आणि काॅसमाॅस ब्लॅक या सहा कलर व्हेरिएंट्स ती उपलब्ध आहे. मॅटिक प्लसला कंपनीने ८० लाख रुपयांच्या रेंजमध्ये उतरवले आहे. भारतीय बाजारात तिची एक्स शोरुम किंमत ७९.५० लाख रुपयांपासून सुरु होते.

loading image
go to top