Meta Campaign
Meta CampaigneSakal

Know What's Real : फेक न्यूज अन् मिसइन्फर्मेशनला लढा देण्यासाठी मेटाने सुरू केली नवी मोहीम; कसं करणार काम?

WhatsApp Fact Check : मेटाने 'फॅक्ट चेक' करण्यासाठी एक खास व्हॉट्सअ‍ॅप चॅनल देखील तयार केलं आहे. तर इन्स्टाग्रामवर देखील फॅक्ट चेक नेटवर्क अधिक मजबूत करण्यात येत असल्याचं मेटाने स्पष्ट केलं.

Meta Campaign against Fake News and Misinformation : सध्या इंटरनेटवर फसव्या आणि खोट्या मेसेजचा भडिमार होताना दिसत आहे. जगभरातील कित्येक देशांमध्ये निवडणुका तोंडावर असताना, फेक न्यूज किंवा खोट्या माहितीचा वापर प्रचारासाठी केला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपची पॅरंट कंपनी असणाऱ्या मेटाने एका नव्या मोहिमेची घोषणा केली आहे.

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, Know What's Real असं या कॅम्पेनचं नाव असणार आहे. आठ आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या या कॅम्पेनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे इन-बिल्ट प्रॉडक्ट फीचर्स आणि सेफ्टी उपायांना लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल. यासोबतच ब्लॉक, रिपोर्ट, फॉरवर्ड लेबल अशा गोष्टींबाबत देखील माहिती देण्यात येईल.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल

मेटाने 'फॅक्ट चेक' करण्यासाठी एक खास व्हॉट्सअ‍ॅप चॅनल देखील तयार केलं आहे. एखादा मेसेज खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी या चॅनलवर तो मेसेज यूजर्स शेअर करू शकतात. केवळ व्हॉट्सअ‍ॅपच नाही, तर इन्स्टाग्रामवर देखील फॅक्ट चेक नेटवर्क अधिक मजबूत करण्यात येत असल्याचं मेटाने स्पष्ट केलं. (WhatsApp Channel for Fact Check)

Meta Campaign
WhatsApp Fact Check Helpline : डीपफेकला बसणार आळा! MCA आणि मेटा मिळून सुरू करणार 'व्हॉट्सअ‍ॅप फॅक्ट-चेक हेल्पलाईन'

False लेबल

चुकीची माहिती देणारा किंवा डीपफेकच्या मदतीने तयार करण्यात आलेला एखादा खोटा मेसेज आल्यास, त्यावर मेटा आता False असा लेबल लावणार आहे. अशाच प्रकारचं फीचर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील लागू करण्यात आलेलं आहे. फेसबुकवर एखाद्या फेक न्यूजच्या खाली तशा प्रकारची वॉर्निंग देखील देण्यात येते. तसंच अशा पोस्टचा रीच देखील कंपनीकडून कमी केला जातो असं मेटाने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com