Meta Hiring : मेटा 'या' व्यक्तीला देणार 1670 कोटी रुपये पगार, भारतीय व्यक्तीनेही दाखवली कमाल..

मेटाने एआय क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी अ‍ॅपलचे तज्ज्ञ रुमिंग पँग यांना तब्बल १६७० कोटींचे पॅकेज देत आपल्या सुपरइंटेलिजन्स लॅबमध्ये सामावून घेतले आहे. ही भरती ओपनएआय आणि गुगलला टक्कर देण्यासाठी मेटाची मोठी चाल मानली जात आहे.
Meta Hiring : मेटा 'या' व्यक्तीला देणार 1670 कोटी रुपये पगार, भारतीय व्यक्तीनेही दाखवली कमाल..
esakal
Updated on

थोडक्यात..

  • मेटाने रुमिंग पँग यांना १६७० कोटींचे पॅकेज देऊन आपल्या टीममध्ये सामावून घेतले.

  • याआधी ट्रिप्त बन्सल यांनाही ८०० कोटींच्या पॅकेजसह भरती करण्यात आले होते.

  • मेटा एआयद्वारे WhatsApp व अन्य अ‍ॅप्समध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवला जात आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी मेटाने आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. अलीकडेच मेटाने एआय क्षेत्रातील जागतिक शर्यतीत आघाडी घेण्यासाठी केलेल्या भरतीमुळे संपूर्ण टेक जगतात एकच खळबळ उडाली आहे. अ‍ॅपलमधून बाहेर पडलेले वरिष्ठ एआय तज्ज्ञ रुमिंग पँग यांना मेटाने तब्बल २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे १६७० कोटी रुपये) इतके भल्यामोठे पॅकेज देऊन आपल्या टीममध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नुकतीच ‘सुपरइंटेलिजेंस लॅब’ स्थापन केली असून, तिच्या माध्यमातून गुगल आणि ओपनएआयसारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. याच लॅबमध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ, संशोधक आणि इनोव्हेटर्स यांची भरती सुरू असून, या भरतीला प्रचंड मोठ्या पगाराच्या ऑफरने वेग आला आहे.

ट्रिप्त बन्सल आणि रुमिंग पँग

यापूर्वी मेटाने आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी ट्रिप्त बन्सल यांना १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ८०० कोटी रुपयेचे आकर्षक पॅकेज देऊ केले होते. आता त्याहून दुप्पट रकमेचे पॅकेज अ‍ॅपलच्या अनुभवी एआय लीड रुमिंग पँग यांना देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये बेस सॅलरी, बोनस आणि मेटाचे शेअर्स यांचा समावेश आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सुपरइंटेलिजेंस लॅबसाठी नेमले जाणारे कर्मचारी अनेक फायदे मिळवतात, जसे की इतर कंपन्यांतील हिस्सेदारी सोडून येणाऱ्यांना भरपाई, सॉफ्टवेअर इनोव्हेशनसाठी स्वातंत्र्य आणि अत्याधुनिक संशोधनाचा भाग होण्याची संधी.

Meta Hiring : मेटा 'या' व्यक्तीला देणार 1670 कोटी रुपये पगार, भारतीय व्यक्तीनेही दाखवली कमाल..
Shubhanshu Shukla Return : आज अंतराळातून पृथ्वीवर परतणार शुभांशू शुक्ला; सोबत घेऊन येत आहेत 'हा' खजिना..

आजघडीला एआय क्षेत्रात ओपनएआय आघाडीवर आहे. SimilarWeb च्या आकडेवारीनुसार, ओपनएआयचे जनरेटिव्ह एआय टूल्स दरमहा १५० दशलक्षांहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतात. गुगल त्यामागे दुसऱ्या स्थानावर आहे. मेटा आता मोठ्या प्रमाणावर भरती करून ही आघाडी तोडण्याच्या प्रयत्नात आहे.

मेटाने स्वतःची AI प्रणाली देखील तयार केली आहे ‘Meta AI’. ही प्रणाली सध्या वेगाने लोकप्रिय होत असून, ती WhatsApp, Instagram, Messenger आणि Facebook मध्ये थेट उपलब्ध आहे. याशिवाय, Meta AI चे स्वतंत्र अॅप Google Play Store आणि App Store वर देखील उपलब्ध आहे.

Meta Hiring : मेटा 'या' व्यक्तीला देणार 1670 कोटी रुपये पगार, भारतीय व्यक्तीनेही दाखवली कमाल..
एकच झलक, सबसे अलग! 'Vivo X Fold 5' अन् 'Vivo X200 FE' स्मार्टफोनची भारतात एन्ट्री; परवडणारी किंमत, दमदार फीचर्स एकदा बघाच..

मेटाचा हा पवित्रा केवळ गुगल, ओपनएआय वा अ‍ॅपलसारख्या तंत्रज्ञानाला टक्कर देण्यासाठी नाही, तर आगामी काळात एआय क्षेत्रात नव्या क्रांतीची नांदी ठरणार आहे. रुमिंग पँग आणि ट्रिप्त बन्सलसारखे तज्ञ मेटाच्या गोटात सामील होणे म्हणजे कंपनीच्या दूरदृष्टीचा ठोस पुरावा म्हणावा लागेल. येत्या काही वर्षांत एआय क्षेत्रात मेटाची वाटचाल किती वेगाने घडते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Meta Hiring : मेटा 'या' व्यक्तीला देणार 1670 कोटी रुपये पगार, भारतीय व्यक्तीनेही दाखवली कमाल..
Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

FAQs

1. मेटाने रुमिंग पँग यांना किती पॅकेज दिले आहे?
मेटाने रुमिंग पँग यांना १६७० कोटी रुपये (२०० दशलक्ष डॉलर्स) चे पॅकेज ऑफर केले आहे.

2. रुमिंग पँग आधी कोणत्या कंपनीत काम करत होते?
ते अ‍ॅपलमध्ये एआय क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

3. मेटाची ही भरती का विशेष मानली जाते?
ही भरती AI क्षेत्रात गुगल व ओपनएआयसारख्या दिग्गजांना टक्कर देण्यासाठी मेटाची धोरणात्मक तयारी दर्शवते.

4. ट्रिप्त बन्सल कोण आहेत आणि मेटाने त्यांना किती पॅकेज दिले?
ट्रिप्त बन्सल हे आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी असून, मेटाने त्यांना ८०० कोटी रुपये (१०० दशलक्ष डॉलर्स) चे पॅकेज देऊन भरती केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com