
Vivo X Fold 5 हा अत्यंत हलका व स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे.
6000mAh बॅटरी व 80W फास्ट चार्जिंगने तो दिवसभर कार्यक्षम राहतो.
Vivo X200 FE मध्ये प्रीमियम झाइस कॅमेरा तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
विवो स्मार्टफोनप्रेमींना मोठी खुशखबर आहे. १४ जुलैला Vivo आपल्या दोन बहुप्रतीक्षित स्मार्टफोनचे लाँचिंग भारतात करत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारा फोल्डेबल फोन Vivo X Fold 5 आणि उच्च दर्जाच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेला Vivo X200 FE हे दोन मॉडेल्स आहेत. भारतात हे दोन्ही फोन दुपारी १२ वाजता अधिकृतपणे सादर केले गेले.
Vivo X Fold 5 हा आतापर्यंतच्या सर्वात स्लिम आणि हलक्या फोल्डेबल फोनपैकी एक आहे. फक्त २१७ ग्रॅम वजन, आणि फोल्ड केल्यावर ०.९२ सेंटीमीटर तर पूर्णपणे ओपन केल्यावर ०.४३ सेंटीमीटर इतकीच त्याची जाडी आहे. त्यामुळे तो सहज खिशात मावणारा आणि आरामात बाळगता येणारा हँडसेट आहे.
डिझाइन हायलाइट्स-
अल्ट्रा थिन आणि हलकी बॉडी
प्रीमियम लूक व हँडग्रिप
ट्रॅव्हल आणि बिझनेस वापरासाठी परिपूर्ण
Vivo X Fold 5 मध्ये देण्यात आली आहे 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, जी दिवसभराचा वापर सहज सांभाळते. या फोल्डेबल हँडसेटमध्ये 80W फ्लॅश चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच कमी वेळात भरपूर चार्जिंग मिळणार आहे
Vivo X Fold 5 बरोबरच कंपनी आणखी एक आकर्षक हँडसेट सादर करणार आहे . Vivo X200 FE. हा फोन खास करून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रेमींसाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये ZEISS कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, उत्कृष्ट इमेज प्रोसेसिंग अनुभव मिळणार आहे.
कॅमेरा फीचर्स
ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
प्रोफेशनल ग्रेड फोटो व व्हिडिओ गुणवत्ता
ZEISS ऑप्टिक्स सपोर्ट
हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल
लक्स ग्रे
अॅम्बर येलो
फ्रॉस्ट ब्लू
Vivo X Fold 5 आणि Vivo X200 FE हे दोन्ही स्मार्टफोन १४ जुलैला अधिकृतपणे भारतात लाँच झाले आहेत. याचे टीझर Vivo च्या अधिकृत पोर्टलवर आधीच पाहायला मिळत आहेत आणि अनेक फीचर्सची पुष्टी झाली आहे.
जरी किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, तरी या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता ते प्रीमियम सेगमेंटमध्ये स्पर्धात्मक किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.
1. विवो X Fold 5 कधी लॉन्च होतो आहे?
१४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भारतात लॉन्च झाला आहे.
2. या फोनची खास फीचर्स कोणती आहेत?
अत्यंत स्लिम डिझाईन, 6000mAh बॅटरी, 80W चार्जिंग आणि फोल्डेबल स्क्रीन.
3. Vivo X200 FE मध्ये कॅमेरा कसा आहे?
यात ZEISS टेक्नोलॉजीसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
4. Vivo X Fold 5 चा Samsung Z Fold 7 शी मुकाबला होईल का?
होय, या दोन्ही प्रीमियम फोल्डेबल फोनमध्ये थेट स्पर्धा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.