Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

Video Rickshaw driver slaps poor girl selling flowers : रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीला रिक्षाचालकाने मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
Rickshaw driver slaps poor girl selling flowers video viral
Rickshaw driver slaps poor girl selling flowers viral video raises questions on poverty and humanityesakal
Updated on

थोडक्यात..

  • रस्त्यावर गुलाब विकणाऱ्या मुलीला रिक्षा चालकाने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

  • समाजातील गरिबी आणि बालश्रमाचं वास्तव या घटनेतून समोर आलं आहे.

  • या घटनेने मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

गरिबी ही एक शाप आहे ही फक्त पुस्तकी वाक्यं वाटावीत, पण वास्तवात या शब्दांचं भयाण रूप पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला गुलाबाची फुलं विकणाऱ्या एका चिमुरडीला रिक्षा चालकाने कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही संतप्त होईल आणि आपली व्यवस्था, आपला समाज अशा प्रसंगी इतका उदासीन का असतो, असा प्रश्न विचारल्यावाचून राहणार नाही.

हा व्हिडीओ @ride_with_shikhar या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुरडी रस्त्याच्या दुभाजकावर एकटी रडत बसलेली दिसते. पोटाची खळगी भरण्यासाठी ती फुलं विकत होती. सिग्नलवर थांबलेल्या रिक्षाच्या मागे धावत जात असताना रिक्षा चालकाने तिला जोरात कानाखाली मारल्याचे समोर आले. तिच्या डोळ्यांतील अश्रू, तिच्या चेहऱ्यावरचा भेदरलेला भाव आणि तिची गोंधळलेली मनस्थिती संपूर्ण समाजाला सवाल विचारते की आपल्याला हे वास्तव दिसतच नाही का?

हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या शिखरने जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती मुलगी काहीच न बोलता रडतच राहिली. "तुला कोणी मारलं?" असा प्रश्न विचारल्यावरही ती उत्तर देण्यास तयार नव्हती. शिखरने तिला गुलाबं खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली, पण तरीही तिने पैसे घेण्यास नकार दिला. कारण तिचा अपमान झाला होता फक्त एका चापटीमुळे नव्हे, तर समाजाच्या वागणुकीमुळे, उपेक्षेमुळे आणि गरिबीच्या जाळ्यामुळे.

Rickshaw driver slaps poor girl selling flowers video viral
Accident Video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! आईच्या डोळ्यासमोर 3 वर्षांच्या बाळाला गाडीने उडवलं; अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "गरिबी हा एक शाप आहे," "शारीरिक त्रास देण्याचा अधिकार कोणालाच नाही," "या मुलीला रस्त्यावर काम करण्यास भाग पाडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे," अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी स्वंयसेवी संस्थांनी हस्तक्षेप करून अशा मुलींचे पुनर्वसन करण्याची गरज व्यक्त केली आहे.

या संपूर्ण घटनेने समाजाला अंतर्मुख होण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला उभं राहून फुलं विकणारी ती चिमुरडी फक्त गुलाब विकत नव्हती, तर ती आपल्या आयुष्याचा लढा लढत होती. तिच्यावर होणारा अन्याय म्हणजे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे. शिखरसारख्या लोकांनी तिच्या भावना समजून घेतल्या, तिला आधार देण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद असलं तरी इतक्यावर भागत नाही. हे प्रकार थांबवण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत

Rickshaw driver slaps poor girl selling flowers video viral
Waterfall Video : धबधब्याच्या टोकावर सेल्फी घ्यायला गेला अन् पाण्यात पडला; खाली 300 फूट खोल दरी, पुढे जे झालं...भयानक व्हिडिओ व्हायरल

FAQs

  1. हा व्हिडीओ कुठे शेअर करण्यात आला आहे?

    @ride_with_shikhar या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

  2. मुलगी काय करत होती जेव्हा रिक्षाचालकाने तिला मारले?

    ती गुलाबाची फुलं विकण्यासाठी रिक्षाच्या मागे धावत होती.

  3. मुलीला मदत करण्याचा प्रयत्न कोणी केला?

    शिखर नावाच्या कंटेंट क्रिएटरने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

  4. या घटनेमुळे काय प्रश्न निर्माण झाले आहेत?

    बालश्रम, समाजाची असंवेदनशीलता आणि गरिबीमुळे मुलांना भोगावं लागणारं शोषण यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com