esakal | स्वस्तात मिळतात 'या' सनरुफ असलेल्या कार, पाहा किंमत आणि फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Sun Roof

स्वस्तात मिळतात 'या' सनरुफ असलेल्या कार, पाहा किंमत आणि फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

एखाद्या कारमध्ये सनरूफ असणे हे प्रीमियम फीचर मानले जाते, त्यामुळे ग्राहकांना सनरूफ असलेली कार खरेदी करणे खूप महाग असेल असे वाटत राहाते पण असे काही नाही. आता बऱ्याचशा कार उत्पादक कंपन्या बजेट कारमध्ये देखील सनरूफ फीचर ऑफर करत आहेत, त्यामुळे तुम्ही कमी पैसे खर्च करून देखील अशी कार खरेदी करु शकता. आज आपण अशाच काही किफायतशीर आणि सनरूफ असलेल्या कारच्या मॉडल्सबद्दल जाणून घेणार आहोत.

किया सोनेट (Kia Sonet)

किया सोनेटया करची किंमत 6,79,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच या कारमध्ये ग्राहकांना 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.0-लिटर टर्बो टी-जीडीआय पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात येतात. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड आयएमटी, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर, 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिकचा पर्याय मिळतो. महत्वाचे म्हणजे ग्राहकांना सनरूफ फीचर देखील मिळते.

ह्युंदाई आय 20 (Hyundai i20)

ही कार 685,100 रुपये किंमतीला खरेदी करता येते. ह्युंदाई आय 20 मध्ये कंपनीला 1.2 कप्पा पेट्रोल इंजिन, 1.5 लीटर युटू सीआरडीआय डिझेल इंजिन आणि 1.0 लीटर कप्पा टर्बो जीटीआय पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो. हे इंजिन अनुक्रमे 5 स्पीड मॅन्युअल, इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि डीसीटी ट्रान्समिशन देतात. तसेच या कारमध्ये सनरूफ देखील देण्यात आले आहे.

हेही वाचा: टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Punch लवकरच होणार लॉंच; पाहा फीचर्स

ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue)

ह्युंदाई व्हेन्यू या कारमध्ये 3 इंजिन ऑप्शन ऑफर केले आहेत, त्यापैकी एक 1.5 लिटर 4-सिलेंडर टर्बो डिझेल BS6 इंजिन आहे जे 90bhp पॉवर आणि 220Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते 1.0 लीटर BS6 टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. तिसऱ्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ह्युंदाई व्हेन्यूमध्ये ग्राहकांना सनरूफ फीचर दिले आहे. तसेच Hyundai Venue ची किंमत 692,100 रुपयांपासून सुरू होते.

टाटा नेक्सन (Tata Nexon)

2021 टाटा नेक्सन 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल आणि BS6 कम्लायंट 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. दोन्ही इंजिन हे 110hp ची पावर जनरेट करतात आणि पेट्रोलमध्ये 170Nm पीक टॉर्क आणि डिझेलमध्ये 260Nm पीक टॉर्क जनरेट करतात. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सनमध्ये ट्रान्समिशनसाठी नंतर 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. टाटा नेक्सनची किंमत 7.19 लाख रुपयांपासून सुरु होते.

हेही वाचा: सीएनजी पेक्षा बेस्ट मायलेज देतात 'या' इलेक्ट्रिक कार; पाहा डिटेल्स

loading image
go to top