एमजी मोटर्सने भारतात लॉंच केली नवीन Gloster, किंमत 31.99 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mg motor india launches 2022 gloster price starts at inr 31.99 lakh check details here

एमजी मोटर्सने भारतात लॉंच केली नवीन Gloster, किंमत 31.99 लाख

MG Motors India ने आज भारतात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन 2022 Gloster SUV लाँच केली आहे ज्याची किंमत रु. 31.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल 1) प्रीमियम SUV म्हणून सादर करण्यात आली आहे.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

ADAS फीचर

कंपनीचे दावा आहे की, नवीन ग्लोस्टरमधील ADAS फीचर हे फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर्स जसे की डोअर ओपन वॉर्निंग (DOW), रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट (RCTA) आणि लेन चेंज असिस्ट (LCA) सह अपडेट करण्यात आले आहे. एमजी मोटर इंडियाच्या म्हणण्यानुसार, नवीन ADAS फीचर हे या SUV ला सुरक्षित आणि सुलभ बनवते.

कलर ऑप्शन काय आहेत?

नवीन 2022 Gloster SUV मेटल ब्लॅक, मेटल अॅश आणि वॉर्म व्हाईट या विद्यमान रंग पर्यायांव्यतिरिक्त डीप गोल्डन ह्यू या नवीन रंगाच्या पर्यायासह येते. याशिवाय, SUV च्या 4WD व्हेरिएंटमध्ये नवीन ब्रिटीश विंडमिल टर्बाइन-थीम असलेले अलॉय व्हील्स देखील देण्यात आली आहेत.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

पॅनोरामिक इलेक्ट्रिक सनरूफ

मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन ग्लोस्टरमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत. यात 31.2 सेमी टचस्क्रीन आणि 12 स्पीकरसह उच्च दर्जाची ऑडिओ प्रणाली देण्यात आली आहे, यात 75 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स आहेत. याशिवाय, यात ड्युअल पॅनोरामिक इलेक्ट्रिक सनरूफ, 12-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्रायव्हर सीट मसाज आणि व्हेंटिलेशन यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत .SUV 2WD आणि 4WD दोन्हीमध्ये 6- आणि 7-सीटर पर्यायांसह येते. यात 2.0-लिटर डिझेल इंजिन असून SUV ला 7 मोडसह ऑल-टेरेन सिस्टम देखील मिळते.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

Web Title: Mg Motor India Launches 2022 Gloster Price Starts At Inr 3199 Lakh Check Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile industry