‘ॲप’निंग : मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर

Microsoft Authenticator
Microsoft Authenticator

सध्या डिजिटल युगात जगताना एकीकडे वेगवान कामासाठी त्याची गरजही भासते; पण त्यात काही ‘अपघात’होऊ नये, याची काळजीही घ्यावी लागते.त्यादृष्टीने आज एका महत्त्वाच्या ॲपची ओळख करून घेऊया. डिजिटल कार्यप्रणालीत ऑथेंटिकेशन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. वेगवेगळी सॉफ्टवेअर प्रणाली असलेली उपकरणे वापरताना ऑथेंटिकेशन प्रत्येक स्तरावर गरजेचे आहे. अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे फोनवर करताना ती सुरक्षितपणे होण्यासाठी ‘मायक्रोसोफ्ट ऑथेंटिकेटर’ हे ॲप उपयोगाचे आहे. हे ॲप दोन स्तरांवर सोपे, सहज आणि सुरक्षितपणे प्रमाणीकरणाची सुविधा देते.

विविध व्यावसायिक आणि वैयक्तिक कामे करताना बोटांचे ठसे, चेहरा ओळखणे आदींद्वारे पासवर्डशिवायही प्रमाणीकरणाची प्रक्रिया याद्वारे करता येते. या ॲपमध्ये पासवर्ड (संकेतशब्द) टाइप केल्यानंतर सुरक्षिततेचा दुसरा स्तर येतो.  दोन स्तरांवरील प्रमाणीकरणा (टीएफए)सह लॉग इन केले जाते. त्यासाठी पासवर्ड वापरावा लागतोच. पण तो आपलाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला अन्य मार्ग विचारला जातो. त्यानंतर एक तर मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटरकडे पाठविलेल्या अधिसूचनेला मान्यता देणे किंवा ॲपद्वारे आलेला वनटाइम पासवर्ड (ओटीपी) देणे कार्यसिद्धीसाठी आवश्‍यक असते. ‘ओटीपी’ म्हणजेच संकेतशब्द हा तीस सेकंद टाइमर मोजणी चालू आहे, तोपर्यंत द्यावा. वन टाइम संकेतशब्द (टीटीपी) दोनदा वापरण्याची आवश्‍यकता नाही आणि नंबर लक्षात ठेवण्याचीही गरज नाही. ‘ओटीपी’ आपल्याला नेटवर्कशी कनेक्‍ट असणेही आवश्‍यक नाही आणि त्यामुळे आपली बॅटरी लवकर संपणार नाही.

ॲप एक, लाभ अनेक
आपण मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर वापरतो, तेव्हा दोन घटक  महत्त्वाचे असतात. प्रमाणीकरण (टीएफए) हे आपल्या मायक्रोसॉफ्ट खात्यात लॉगइन करण्यासाठी आपला फोन, पासवर्ड वापरण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी फक्त आपले वापरकर्ता नाव देऊन, त्यानंतर आपल्या फोनवर पाठविलेल्या सूचनेस मंजुरी देणे गरजेचे आहे.

आपला बोटांचा ठसा, चेहऱ्याची खूण किंवा पिन या दोन टप्प्यांनी व्हेरिफिकेशन प्रक्रियेत सुरक्षेचा दुसरा स्तर प्रदान होतो. दोन टप्पा प्रमाणीकरणा (टीएफए)सह साइन इन केल्यानंतर, आपल्याला सर्व मायक्रोसॉफ्ट उत्पादने आणि सेवांमध्ये उदाहरणार्थ आउटलुक, वनड्राइव्ह, ऑफिस इत्यादींमध्ये सहज प्रवेश असेल.

लिंक्‍डइन, गिथब, ॲमेझॉन, ड्रॉपबॉक्‍स, गुगल, फेसबुक आणि इतर मायक्रोसॉफ्ट नसलेल्या खात्यांसह आपल्या ॲपमध्ये अनेक खाती जोडू शकता. ॲप वेळेवर आधारित वन टाइम संकेतशब्दांसाठी (टीटीपी) उद्योग मानकांचे समर्थन करत असल्याने आपली सर्व ऑनलाइन खाती सुरक्षित करू शकतो. मात्र यासाठी आपल्या सर्व खात्यांवर फक्त दोन घटक प्रमाणीकरण (टीएफए) सक्षम करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण केव्हाही साइन इन करता, तेव्हा नेहमीप्रमाणे आपले वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द प्रदान करू शकाल.

या ॲपद्वारे आपल्या कोणत्याही उपकरणावर कार्यालयीन कामकाजासाठी नोंदणी करायची असेल तर सोपे होते.वैयक्तिक खाते जोडण्याची आवश्‍यकता असेल, त्या वेळी मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर आपल्या डिव्हाइसवर प्रमाणपत्र जारी करेल. ते प्रमाणपत्र-आधारित प्रमाणीकरणालाही सहजपणे मान्यता करून देऊ शकते. हे आपल्या कार्यालयास कळविले, की प्रत्येक `लॉग इन’ न करता अखंडपणे आणि सुरक्षितपणे अतिरिक्त मायक्रोसॉफ्ट ॲप्स आणि सेवांमध्ये प्रवेश करण्यासही मदत करेल.

मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर एकदा सिंगल साइन-इनला समर्थन देऊन, आपली ओळख एकदाच सिद्ध केल्यावर आपल्या डिव्हाइसवरील अन्य मायक्रोसॉफ्ट ॲप्समध्ये पुन्हा पुन्हा लॉगइन करण्याची आवश्‍यकता नाही. एकूणच असे अनेक फायदे या `ॲप’मुळे होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com