Microsoft Copilot Pro : मायक्रोसॉफ्टचं नवं एआय टूल झालं सर्वांसाठी उपलब्ध; भारतात किती आहे किंमत? जाणून घ्या

Copilot Pro Price : मायक्रोसॉफ्ट कोपायलेट प्रो हे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट आणि आउटलुक अशा अ‍ॅप्समध्ये अ‍ॅक्सेस मिळवून देतं.
Microsoft Copilot Pro
Microsoft Copilot ProeSakal

Microsoft Copilot Pro Subscription : मायक्रोसॉफ्टने यावर्षी जानेवारी महिन्यात आपलं कोपायलेट प्रो हे जनरेटिव्ह एआय सादर केलं होतं. हा मायक्रोसॉफ्टचा सर्वात शक्तिशाली एआय असिस्टंट आहे. सुरुवातीला केवळ ठराविक यूजर्सना याचा अ‍ॅक्सेस दिला होता. मात्र आता जगभरातील सर्व यूजर्ससाठी हे उपलब्ध करुन दिलं आहे. यापूर्वी 222 देशांमध्ये केवळ कोपायलेट उपलब्ध होतं. आता या सर्व देशांमध्ये कोपायलेट प्रो देखील उपलब्ध झालं आहे.

मायक्रोसॉफ्ट कोपायलेट प्रो हे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट आणि आउटलुक अशा अ‍ॅप्समध्ये अ‍ॅक्सेस मिळवून देतं. याठिकाणी काम करताना जलदगतीने आणि अचूक परिणाम देण्याचं काम कोपायलेट प्रो करतं. यासोबतच इमेज जनरेट करण्यासाठी DALL-E3 चा अ‍ॅक्सेस देखील देता येतो. यासोबतच GPT-4 आणि GPT-4 टर्बो मॉडेलचा अ‍ॅक्सेस देखील कोपायलेट प्रो सोबत मिळतो.

यूजर्सना मिळतोय मोफत अ‍ॅक्सेस

मायक्रोसॉफ्ट 365 वेब अ‍ॅप्समध्ये 'कोपायलेट प्रो'चे फीचर्स मोफत मिळत आहेत. म्हणजेच, यूजर्सना आपल्या डेस्कटॉपवर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वर्ड, आउटलुक अशा इतर अ‍ॅप्समध्येही कोपायलेटचा अ‍ॅक्सेस मिळत आहे. ज्या यूजर्सकडे मायक्रोसॉफ्ट 365 पर्सनल किंवा फॅमिली सबस्क्रिप्शन आहे त्यांनाच कोपायलेट प्रो मोफत मिळेल. मायक्रोसॉफ्ट लवकरच हे फीचर्स मोबाईल अ‍ॅप्समध्येही देण्याचा विचार करत आहे.

Microsoft Copilot Pro
Microsoft Copilot : कार अपघाताचे फोटो बनवायला सांगितले अन् याने कहरच केला.. 'जेमिनी'नंतर आता 'कोपायलट' देखील वादात!

कोपायलेटचे खास फीचर्स

  • कोपायलेट प्रो हे 222 देशांमद्ये उपलब्ध झालं आहे.

  • तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट अकाउंट नसेल, तर एक महिन्यासाठी तुम्ही कोपायलेट प्रोची मोफत ट्रायल घेऊ शकता.

  • कोपायलेट प्रो वापरण्यासाठी तुम्हाला नवीन मायक्रोसॉफ्ट 365 सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.

  • लवकरच मोबाईल अ‍ॅप्समध्येही कोपायलेट प्रो फीचर्स देण्याचा विचार कंपनी करत आहे.

  • ज्या यूजर्सकडे मायक्रोसॉफ्ट 365 सबस्क्रिप्शन नाही, त्यांना कोपायलेट प्रोचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.

  • भारतात या सबस्क्रिप्शनची किंमत 2,000 रुपये प्रति महिना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com