

Microsoft Layoff
ESakal
मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीने अचानक अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने तंत्रज्ञान जगतात खळबळ उडाली आहे. या बातमीने केवळ तंत्रज्ञान जगतालाच नव्हे, तर तिथे नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनाही धक्का बसला आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे २.१ टक्क्यांनी कमी करण्याची योजना आखत आहे. याचा अर्थ ४,८०० कर्मचारी आपली नोकरी गमावतील.