Microsoft Windows 10 : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् जगभरातील 24 कोटी विंडोज कम्प्युटर निघणार भंगारात; जाणून घ्या

कॅनालिस रिसर्च या संस्थेने केलेल्या रिसर्चनुसार, या निर्णयामुळे विंडोज 10 सपोर्ट करणाऱ्या कम्प्युटरची मागणी कमी होईल.
Microsoft Windows 10 Update
Microsoft Windows 10 UpdateeSakal
Updated on

Microsoft Windows 10 Update : टेक जायंट मायक्रोसॉफ्ट एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात कंपनी विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी सिक्युरिटी अपडेट्स (Windows OS Security Update) देणं बंद करणार आहे. यामुळे या ओएसवर चालणाऱ्या जगभरातील 24 कोटी कम्प्युटर आणि लॅपटॉप्सवर मोठा परिणाम होणार आहे.

कसा होणार परिणाम?

विंडोज 10 ओएसला सपोर्ट बंद केल्यानंतर हे कम्प्युटर थेट बंदच पडतील असं नाही. सध्या हे पीसी (Windows PC) ज्याप्रमाणे कार्यरत आहेत, ते तसेच चालत राहतील. मात्र, यामध्ये नवीन बग किंवा काही त्रुटी आल्यास, कंपनी त्यावर उपाय देणार नाही.

सध्या हॅकर्स हे नवनवीन पद्धतींनी ऑपरेटिंग सिस्टीमच्या सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत असतात. ओएस अपडेट (Windows OS Update) केली, की नवीन मालवेअर किंवा व्हायरसवर उपाय दिला जातो. विंडोज 10 अपडेटच होणार नसल्यामुळे, त्यामध्ये नवीन प्रकारचा व्हायरस आल्यास तो सिस्टीमला हानीकारक ठरू शकतो. यामुळे, विंडोज 10 वर चालणारे पीसी थेट बंद पडणार नसले, तरी ते वापरणं धोकादायक ठरू शकतं.

Microsoft Windows 10 Update
Google Chrome : आता हॅकर्सना टक्कर देण्यासाठी गुगलच घेणार पुढाकार; क्रोममध्ये येणार नवीन फीचर

कधी होणार बंद?

मीडिया रिपोर्ट्सनुसार विंडोज 10 ओएसचा सपोर्ट हा 10 ऑक्टोबर 2025 या दिवसापासून बंद होईल. अर्थात, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात येत आहे, की ठराविक सबस्क्रिप्शनसह 2028 पर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देण्याचा निर्णय कंपनी घेऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात वाढ

कॅनालिस रिसर्च (Canalys Research) या संस्थेने केलेल्या रिसर्चनुसार, या निर्णयामुळे विंडोज 10 सपोर्ट करणाऱ्या कम्प्युटरची मागणी कमी होईल. यामुळे सुमारे 240 मिलियन कम्प्युटर भंगारात निघतील. यातून निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा हा 3,20,000 गाड्यांएवढा असेल असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Uday Samant Says Maharashtra Will Verify Centre’s Company Closure Data
We Must Act Now”: Sixteen Nobel Laureates Join Leading Economists and AI Researchers in Call to Prepare for AI’s Economic Transformation
Microsoft Layoffs
Microsoft Layoff
Marathi News Esakal
www.esakal.com