मायक्रोसॉफ्टचे नवे फीचर, टीम मिटींग रेकॉर्डिंग आपोआप होणार डिलीट| Microsoft New Feature | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Microsoft New Feature

मायक्रोसॉफ्टचे नवे फीचर, टीम मिटींग रेकॉर्डिंग आपोआप होणार डिलीट

टेक जायंट मायक्रोसॉफ्टने टीम्ससाठी (Microsoft Teams) एक नवीन फीचर आणले आहे, हे फीचर पूर्वनिर्धारित वेळेनंतर OneDrive किंवा SharePoint मध्ये संग्रहित रेकॉर्डिंग फाइल्स आपोआप डिलीट करेल . ZDNet च्या रिपोर्टनुसार, Microsoft ने टीम्स कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्मसाठी डिसेंबर अपडेट्समध्ये हे नवीन फीचर आणले आहे, ज्यामध्ये कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि टीम्स आणि अँड्रॉइडमधील इमर्जंसी कॉल केल्यानंतर काही डिव्हाइसेस फ्रीझ होण्याची समस्या सोडवली जाईल.

एडमीन्स डीफॉल्टनुसार चालू असणारे हे ऑटो-एक्सपायरेशन (Auto-Expiration) फीचर बंद करू शकतात. एकदा रोल आउट झाल्यानंतर, तुम्ही हे फीचर बंद केले नाही तर तुमच्या सर्व नवीन रेकॉर्डिंग रेकॉर्ड झाल्यानंतर 60 दिवसांनी आपोआप डीलिट केल्या जातील.

सर्व नव्याने तयार केलेल्या टीम मीटिंग रेकॉर्डिंगची (TMR) डीफॉल्ट मुदत 60 दिवसांची असणार आहे. हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी डीफॉल्ट चालू होणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे , याचा अर्थ असा की डीफॉल्टनुसार, हे फीचर चालू झाल्यानंतर तयार झालेल्या सर्व टीम मीटिंग रेकॉर्डिंग (TMR) त्यांच्या रेकॉर्डिंग तारखेनंतर 60 दिवसांनी आपोआप डिलीट केल्या जातील.

हेही वाचा: Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही

टीम्स अॅडमिन सेंटरमध्ये जाऊन किंवा पॉवरशेल कमांड वापरून कधीही ऑटो-एक्स्पायर न होण्यासाठी (never auto-expire) मीटिंग सेट करू शकतात. मायक्रोसॉफ्टने जुन्या रेकॉर्डिंग मुळे तयार झालेले स्टोरेज क्लटर कमी करण्यासाठी ही एक हलकी हाउसकीपिंग यंत्रणा असे फीचरचे वर्णन केले आहे, जे रेकॉर्डिंगच्या प्रति तास भरासाठी सरासरी 400 MB क्लाउड स्टोरेज वापरते.

हेही वाचा: तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लसीसाठी पात्र आहात का? येथे जाणून घ्या नियम

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Microsoft Company
loading image
go to top