Wood Display : चक्क लाकडापासून बनणार मोबाईलची स्क्रीन! काय आहे हे नवीन तंत्रज्ञान?

लाकडाचे एक मिलिमीटर जाडीचे थर हे सुमारे 80 ते 90 टक्के पारदर्शक होतात. जेवढा हा थर जाड होईल, तेवढं लाकूड अपारदर्शक होत जातं.
Wood Display
Wood DisplayeSakal

Mobile Display made from Wood : सध्या स्मार्टफोन हा सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक झाला आहे. स्क्रीन-टच स्मार्टफोन असल्यामुळे डिस्प्ले हा फोनमधील सगळ्यात महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. सध्या मोबाईलच्या स्क्रीन या प्लास्टिक आणि काचेपासून तयार होतात. मात्र, शास्त्रज्ञ आता चक्क लाकडापासून मोबाईलची स्क्रीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सायंटिफिक अमेरिकनच्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. स्वीडनच्या केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये याबाबत रिसर्च सुरू आहे. केटीएचचे लार्स बर्गलुंड आणि मॅरिलँड विद्यापीठाचे काही रिसर्चर मिळून हे संशोधन करत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून यावर काम सुरू आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

असं केलं संशोधन

संशोधकांनी यासाठी Lignin नावाचा एक पदार्थ लाकडातून काढून टाकण्याचं तंत्र विकसित केलं आहे. हा डिंकासारखा पदार्थ जमीनीतील पाणी आणि पोषक तत्वे झाडामध्ये सगळीकडे पोहोचवण्याचं काम करतो. यामुळेच झाडाला विटकरी किंवा चॉकलेटी रंग येतो. हा पदार्थ काढून टाकल्यास लाकडाचा रंग निघून जातो. त्यानंतर इपॉक्सी रेझिन वापरुन या लाकडाला पारदर्शक बनवता येतं.

Wood Display
निकोला टेस्ला यांच्या पाच भविष्यवाण्या; ज्या आज झाल्यात खऱ्या

अशी प्रक्रिया केल्यानंतर लाकडाचे एक मिलिमीटर जाडीचे थर हे सुमारे 80 ते 90 टक्के पारदर्शक होतात. जेवढा हा थर जाड होईल, तेवढं लाकूड अपारदर्शक होत जातं. अर्थात, याचा अगदी पातळ थरही प्लास्टिकपेक्षा तीन पट आणि काचेपेक्षा 10 पट अधिक मजबूत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

इको फ्रेंडली नाही

भविष्यात लाकडाचे डिस्प्ले हा प्लास्टिकसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. मात्र, हे पर्यावरणपूरक नक्कीच नाहीत. याला कारण म्हणजे, यात वापरण्यात आलेलं इपॉक्सी रेझिन. हा एक पेट्रोलियमपासून तयार करण्यात आलेला एक पदार्थ आहे, जो प्लास्टिकचाच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com