मोबाइलचं बिल वाढणार; टेलिकॉम कंपन्या घेऊ शकतात निर्णय

mobile telecom industry tarrif plan charges
mobile telecom industry tarrif plan charges

नवी दिल्ली - सध्या मोबाइल इंटरनेट आणि कॉलिंग सेवा स्वस्त आहेत. मात्र येत्या काळात यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. टेलिकॉम कंपन्या लवकरच मोबाइल डेटाचे दर वाढवण्याची घोषणा करू शकतात. इन्व्हेस्टमेंट इन्फर्मेशन फर्म ICRA ने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात काही पावले उचलण्याची शक्यता आहे. यामध्ये 2021-22 मध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी कंपन्या हालचाल करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी काही टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ रेटमध्ये वाढ केली होती. 

टॅरिफमध्ये वाढ आणि ग्राहकांना 2 जी मधून 4जी अपग्रेडेशनमुळे अॅवरेज रिव्हेन्यू पर युजरमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. मीडियम टर्ममध्ये हे जवळपास 220 रुपये असू शकतं. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, पुढच्या दोन वर्षात इंडस्ट्रीचं उत्पन्न 11 ते 13 टक्के आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास 38 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. आय़सीआरएनं त्यांच्या आऊटलूक रिपोर्टमध्ये सांगितलं की, सध्या हे क्षेत्र इनफ्लेशन पॉइंटच्या दिशेनं जात आहे. यात वाढीचा पुढचा टप्पा बिगर टेल्को व्यवसायांकडून चालवणे हा आहे. यामध्ये एटरप्रायजेस बिझनेस, क्लाउड सर्व्हिस, डिजिटल सर्व्हिस आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सर्व्हिसेसचा समावेश आहे. 

ICRA चे म्हणणे आहे की, कॅश फ्लो जनरेशनमध्ये सुधारणा आणि इतर खर्चांसाठी बाहेरून कर्ज घेण्याची गरज जास्त पडणार नाही. मात्र अॅडजस्टेड ग्रॉस रिव्हेन्यू थकीत बाकी याशिवाय कर्ज आणि स्पेक्ट्रमच्या लिलावामुळे टेलिकॉम कंपन्यांवर दबाव वाढेल.  यामध्ये 5 जी ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनामुळे इतर क्षेत्रावर बराच परिणाम झाला मात्र टेलिकॉम इंडस्ट्रीवर फारसा परिणाम झाला नाही. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन स्कूल, कंटेंट वॉचिंग अॅडमुळे डेटा वापर वाढला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com