Jio शी जोडले 15 लाखाहून अधिक युजर्स! Airtel व Vodafone Idea ला धक्का

Jio शी जोडले 15 लाखांहून अधिक युजर्स! Airtel व Vodafone Idea चे मोठे नुकसान
jio
jioesakal
Summary

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला ऑक्‍टोबरमध्ये खूप मोठा फायदा झाला आहे.

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला (Reliance Jio) ऑक्‍टोबरमध्ये खूप मोठा फायदा झाला आहे. जिओ कंपनीशी 17.6 लाख युजर्स जोडले आहेत. Airtel आणि Vodafone Idea चे मोठे नुकसान झाले आहे, तर एकूण 14.3 लाख वापरकर्ते या दोन्ही कंपन्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (Telecom Regulatory Authority of India - TRAI) ही आकडेवारी जाहीर केली आहे. (More than 1.5 million users joined Jio in October)

jio
जगात हाहा:कार, भारतात शांत! एका दिवसात केवळ 5326 नवीन कोरोना रुग्ण

इतक्‍या युजर्सने सोडले एअरटेलची साथ

ट्रायच्या अहवालानुसार 4.89 लाख युजर्सनी एअरटेल सोडली आहे. तर व्होडाफोन आयडियाने 9.64 लाख वापरकर्ते गमावले आहेत. आता एअरटेलच्या युजर्सची संख्या 35.39 कोटींवर आली आहे. सप्टेंबरमध्ये 2.74 लाख वापरकर्ते एअरटेल कंपनीशी जोडलेले होते.

जिओचे आहेत इतके युजर्स

ट्रायच्या म्हणण्यानुसार, युजर्सची संख्या वाढल्यानंतर आता जिओचा युजर बेस 42.65 कोटी झाला आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 1.90 कोटी होता. दुसरीकडे, Vodafone Idea चा युजर बेस 26.90 कोटी झाला आहे. सप्टेंबरमध्ये त्यांची संख्या 10.77 लाख होती.

ऑक्‍टोबरमध्ये एकूण युजर्सची संख्या वाढली

TRAI म्हणते की, ऑक्‍टोबर अखेरीस भारतात 118.96 कोटी वापरकर्ते वाढले आहेत. शहरातील वापरकर्त्यांची संख्या 65.88 कोटी आणि ग्रामीण वापरकर्त्यांची संख्या 65.88 कोटी आहे.

jio
धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट

पाहा या कंपन्यांचे मार्केट शेअर्स

वायरलेस सेगमेंटमध्ये (Wireless Segment) BSNL आणि MTNL ने Jio ला मागे टाकले आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलचा मार्केट शेअर 9.91 टक्के आहे, तर जिओचा टेलिकॉम मार्केट शेअर 90.09 टक्के आहे. त्याच वेळी एअरटेलची हिस्सेदारी 29.83 टक्के आणि व्होडाफोन आयडियाची हिस्सेदारी 22.91 टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com