धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट

धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट! 15 हजारांच्या आत किमती
धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट! 15 हजारांच्या आत किमती
धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट! 15 हजारांच्या आत किमतीesakal
Summary

जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 15 हजार रुपयांच्या आत ब्रॅंडेड स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

बजेट सेग्मेंटचे स्मार्टफोन (Smartphone) युजर्सना खूपच आवडतात. यामध्ये अनेक स्मार्टफोन्स आहेत, ज्यामध्ये प्रीमियम हॅंडसेट फीचर्स देखील देण्यात आले आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवर (Flipkart) तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत एकापेक्षा जास्त पर्याय मिळतील. विशेष बाब म्हणजे, फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर 5 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह आकर्षक एक्‍सचेंज ऑफर (Exchange Offer) आणि अनेक फायदेही दिले जात आहेत. (Smartphones with the best features are available for less than Rupees 15 thousand)

तुम्ही SBI क्रेडिट कार्डने (SBI Credit Card) खरेदी केल्यास, तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के सूट देखील मिळेल. त्याच वेळी, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही टॉप डील्सबद्दल.

धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट! 15 हजारांच्या आत किमती
SBI देणार आता FD वर जादा परतावा! बॅंकेने वाढवला व्याजदर

Motorola G40 फ्यूजन

6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोअरेज असलेला हा फोन 5 हजार रुपयांच्या सवलतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 14,999 रुपये झाली आहे. 6000mAh बॅटरीसह सुसज्ज या फोनमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 64 मेगापिक्‍सल कॅमेरा आणि समोर 16 मेगापिक्‍सल कॅमेरा आहे.

सॅमसंग गॅलेक्‍सी Samsung Galaxy F22

तुम्ही या सॅमसंग फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोअरेजसह व्हेरिएंट विक्रीमध्ये 11 टक्केच्या सूटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 14,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. एक्‍सचेंज ऑफरमध्ये फोन घेऊन तुम्हाला 14,450 रुपयांपर्यंतचा फायदा देखील मिळू शकतो. या सॅमसंग फोनमध्ये 6.4 इंच AMOLED डिस्प्लेसह 48 मेगापिक्‍सल क्वाड कॅमेरा सेटअप आहे. 6000mAh बॅटरीने सुसज्ज हा फोन MediaTek Helio G80 प्रोसेसरवर काम करतो.

Moto G51 5G

तुम्ही सेलमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोअरेज असलेला हा फोन 17,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. एक्‍सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास तुम्हाला 14,450 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. फोनमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.8 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्‍सलचा प्रायमरी कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 16 मेगापिक्‍सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

धमाकेदार सेल! 'या' ब्रॅंडेड स्मार्टफोन्सवर 5 हजारांपर्यंत सूट! 15 हजारांच्या आत किमती
नो टेन्शन! तुमच्या फोनमधील Photo-VDO लागणार नाहीत कोणाच्या हाती

realme 8i

सेलमध्ये या फोनवर 2 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 13,999 रुपये झाली आहे. एक्‍सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्हाला या फोनवर 13,350 रुपयांपर्यंतचे अधिक फायदे मिळू शकतात. 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोअरेजने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्‍सल आणि फ्रंटमध्ये 16 मेगापिक्‍सल कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी नारजो 30 (realme narzo 30)

सेलमध्ये या फोनची किंमत 14,999 रुपयांवरून 13,499 रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही सेलमध्ये हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 12,850 रुपयांपर्यंतचा अधिक फायदा मिळू शकतो. रियलमीचा हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोअरेजने सुसज्ज आहे. 6.5 इंचाच्या डिस्प्लेसह येत असलेल्या या फोनमध्ये 48 मेगापिक्‍सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 30W स्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com