Internet In India : तंत्रज्ञान क्षेत्रात भारत पुढे, मात्र देशातील कोट्यवधी लोकांकडे अजूनही नाही इंटरनेट.. काय आहेत कारणं?

India Internet users : भारताच्या ग्रामीण भागातील जवळपास निम्मे लोक इंटरनेट वापरत नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यासाठी विविध कारणं असल्याचं सांगण्यात येतंय.
Internet In India
Internet In IndiaeSakal

Internet in India report 2023 : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत सध्या वेगाने प्रगती करत आहे. यामध्ये इंटरनेटचा मोठा वाटा आहे. देशातील ग्रामीण भागातही सध्या इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. मात्र, असं असलं तरीही अद्याप कोट्यवधी लोक सक्रियपणे इंटरनेट वापरत नसल्याचं एका अहवालात समोर आलं आहे.

इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि Kantar या संस्थेने मिळून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 66.5 कोटी लोक आजही नियमिक किंवा सक्रियपणे इंटरनेट वापरत नाहीत. अर्थात, इंटरनेट यूजर्सची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. एबीपीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2021 साली देशातील सुमारे 76.2 कोटी लोक इंटरनेटपासून वंचित होते. तर 2022 साली ही संख्या कमी होऊन 71.4 कोटी झाली. 2023 सालच्या आकडेवारीनुसार ही संख्या 66.5 कोटी झाली आहे. दरवर्षी सुमारे 3-4 टक्क्यांनी ही संख्या कमी होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. (Internet Users in India)

Internet In India
Internet in India : भारतात 80 कोटी इंटरनेट यूजर्स, ग्रामीण भागातील संख्या वाढली.. 86 टक्के लोक करतात केवळ टाईमपास - रिपोर्ट

काय आहेत कारणं?

भारताच्या ग्रामीण भागातील जवळपास निम्मे लोक इंटरनेट वापरत नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यासाठी विविध कारणं असल्याचं सांगण्यात येतंय. इंटरनेट न वापरणाऱ्या 23 टक्के लोकांनी आपल्याला ते समजतच नाही, असं म्हटलं आहे. (Non-Internet users in India)

इंटरनेट न वापरणाऱ्या लोकांपैकी -

  • 22 टक्के लोक म्हणतात, की त्यांना इंटरनेटच्या फायद्यांची माहिती नाही.

  • 22 टक्के लोक म्हणतात की त्यांना इंटरनेटचा वापर करण्यात रस नाही.

  • 21 टक्के लोक म्हणतात की त्यांना इंटरनेट वापरण्याची परवानगी नाही.

  • 17 टक्के लोक म्हणतात की त्यांना इंटरनेटसाठीचा खर्च परवडत नाही.

  • 16 टक्के लोक म्हणतात की त्यांच्यासाठी इंटरनेट कन्फ्युझिंग आहे.

  • 13 टक्के लोक म्हणतात की इंटरनेटवर त्यांच्यासाठी काही खास नाही.

  • 13 टक्के लोक म्हणतात की इंटरनेटमुळे खूप वेळ वाया जातो, आणि आपल्याकडे तेवढा फालतू वेळ नाही.

Internet In India
Internet Speed Ranking : इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताची मोठी झेप! अवघ्या एका वर्षात तब्बल 51 स्थानांनी वर आला देश...

ग्रामीण भागात वाढले इंटरनेट यूजर्स

दरम्यान, देशातील ग्रामीण भागातील इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत असल्याचं या अहवालात सांगितलंय. देशात सध्या 80.2 कोटी सक्रिय इंटरनेट यूजर्स आहेत. त्यातील 44.2 कोटी, म्हणजेच निम्म्याहून अधिक सक्रिय यूजर्स हे ग्रामीण भागातील असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com