जगातील करोडो लोक वापरतात 'हे' अ‍ॅप; सर्वाधिक लोकप्रिय App भारतात मात्र बॅन | Most Popular app in World | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiktok
जगातील करोडो लोक वापरतात 'हे' अ‍ॅप; सर्वाधिक लोकप्रिय App भारतात मात्र बॅन | Most Popular app in World

जगातील करोडो लोक वापरतात 'हे' अ‍ॅप; सर्वाधिक लोकप्रिय App भारतात मात्र बॅन

भारतात अनेक सोशल मीडिया अ‍ॅपचा वापर केला जातो. फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर अ‍ॅपची तरुण पिढी दिवाणी आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी एक होतं ज्याने भारतीय वापरकर्त्यांना वेड लावले होते. हे अ‍ॅप होते टिकटॉक (TikTok). सरकारने जून 2020 मध्ये त्यावर बंदी घातली. या अ‍ॅपवर भारतात जरी बंदी असली तरी ते मात्र प्रचंड लोकप्रिय होत आहे. सेन्सॉरटॉवरच्या ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की TikTok अ‍ॅप 2022 च्या सुरुवातीपासून जगभरात सर्वाधिक डाउनलोड केलेले आणि सर्वाधिक कमाई करणारे अॅप बनले आहे.

हेही वाचा: आता Hangouts होणार गायब, चॅटिंगसाठी Googleचं नव अ‍ॅप येणार

अ‍ॅअहवालानुसार, TikTok ने या तिमाहीत दोन्ही स्टोअरमधील ग्राहकांकडून 821 दशलक्ष डॉलर (सुमारे 6,239 कोटी रुपये) कमावले आहेत. याला Google Play Store वर टिकटॉकला दुसरे स्थान मिळाले आहे. तर पहिले स्थान Google One ने मिळवलं आहे. सुमारे 250 दशलक्ष डॉलर (सुमारे 1,899 कोटी रुपये) कमावले आहेत.

SensorTower डेटानुसार TikTok हे 187 दशलक्षाहून अधिक इंस्टॉलसह जगभरात सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप आहे. ऍपल अ‍ॅप स्टोअरच्या चार्टवर नजर टाकल्यास हे देखील दिसून येते की व्हिडिओ-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये देखील टिकटॉक प्रथम क्रमांकावर आहे.

हेही वाचा: IPL 2022 च्या मुहूर्तावर टाटा ग्रुप लॉन्च करणार 'TATA NEU' अ‍ॅप

2021 मध्ये फेसबुक हे गुगल प्लेवर सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप होते, त्याउलट या वर्षी इंस्टाग्राम हे या जागेत सर्वात जास्त डाउनलोड केलेले अ‍ॅप म्हणून उदयास आले, पहिल्यांदाच 125.8 दशलक्ष इंस्टॉल झाले आहेत.

टॅग्स :AppMobile AppTikTok