Motorola : फोन खरेदीचा विचार करताय? मोटोरोला घेऊन येतेय दोन नवे फोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

moto g13 and moto g23 specifications tipped check expected features

Motorola : फोन खरेदीचा विचार करताय? मोटोरोला घेऊन येतेय दोन नवे फोन

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस थांबणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या Motorola दोन नवीन स्मार्टफोन्सवर काम करत आहे ज्यात Moto G13 आणि Moto G23 यांचा समावेश आहे. Moto G23 बद्दल कोणताही खास रिपोर्ट समोर आलेला नाही, पण Moto G13 चे काही फीचर्स नक्कीच समोर आले आहेत.

असे बोलले जात आहे की Moto G13 आणि Moto G23 दोन्ही फोन मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल. याशिवाय फोनमध्ये Android 13 उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

TechOutlook च्या रिपोर्टनुसार, Moto G13 आणि Moto G23 या दोन्ही फोनचे कोडनेम अनुक्रमे Penang 4G आणि Penang 4G Plus आहेत. Moto G13 मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचे रिझोल्यूशन 720x1600 पिक्सेल आणि 90Hz चा रिफ्रेश रेट असेल.

असे सांगितले जात आहे की, Moto G13 मध्ये तीन रियर कॅमेरे मिळतील ज्यामध्ये प्राइमरी लेन्स ही 50 मेगापिक्सेल असेल. इतर दोन लेन्सपैकी एक 2-मेगापिक्सेल मॅक्रो असेल आणि दुसरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असेल. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Moto G13 आणि Moto G23 मध्ये 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज मिळू शकते. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असेल. Moto G13 आर्कटिक ब्लू कलरवे मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

हेही वाचा: अनेकांचे अधुरे स्वप्न होणार पूर्ण; Yamaha RX100 चा आवाज पुन्हा घुमणार

Moto G23 ला 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देखील मिळेल, परंतु कॅमेरा केसमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. Moto G23 मध्ये तीन रियर कॅमेरे देखील मिळतील ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असेल. दुसरी लेन्स 5 मेगापिक्सल्सची अल्ट्रा वाईड अँगल असेल आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्स मॅक्रो असेल. समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.

हेही वाचा: Bhagat Singh Koshyari : मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? कोश्यारींच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची टीका

Moto G23 ला 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज मिळेल. यात Moto G13 सारखीच बॅटरी देखील मिळेल परंतु त्यासोबत 30W फास्ट चार्जिंग असेल. हा फोन पर्ल व्हाइट कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या या दोन्ही फोन्सबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.