
मोटो G96 5G मध्ये 144Hz pOLED कर्व्ह्ड डिस्प्ले आणि Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे.
50MP Sony कॅमेरा, 32MP सेल्फी आणि AI फोटो टूल्समुळे उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव मिळतो.
फक्त 17,999 या सुरुवातीच्या किंमतीत प्रीमियम फिचर्स आणि IP68 रेटिंगसह हा फोन आकर्षक ठरतो.
Motorola New Mobile : भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड मोटोरोला यांनी त्यांच्या नवीन मिडरेंज स्मार्टफोनचा Moto G96 5G भव्य लॉन्च केला आहे. केवळ 17,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या डिव्हाईसमध्ये कंपनीने अनेक प्रीमियम फीचर्सचा समावेश केला आहे, ज्यामध्ये दमदार कॅमेरा, फास्ट प्रोसेसर आणि आकर्षक डिझाइनचा समावेश आहे.
Moto G96 5G 16 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Moto G96 5G मध्ये 6.67-इंचाचा Full HD+ 3D कर्व्ह्ड pOLED डिस्प्ले आहे जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स ब्राइटनेस सह येतो. स्क्रीनवर Corning Gorilla Glass 5 संरक्षण दिले आहे. यामध्ये पाण्यावरही टच प्रतिसाद देणारी वॉटर टच टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.
डिव्हाइसचा डिझाइनही लक्षवेधी आहे व्हीगन लेदर फिनिश सह येणारा हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट प्रमाणपत्रासह येतो. डिव्हाइसचे वजन केवळ 178.1 ग्रॅम असून त्याची जाडी 7.93 मिमी आहे.
हा स्मार्टफोन नवीनतम Snapdragon 7s Gen 2 चिपसेटसह सुसज्ज आहे, ज्यामुळे गेमिंग आणि मल्टिटास्किंगचा अनुभव अधिक सहज होतो. डिव्हाइस Android 15 आधारित Hello UI वर चालतो.
यामध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट्स आहेत
8GB RAM + 128GB स्टोरेज –17,999 रुपये
8GB RAM + 256GB स्टोरेज – 19,999 रुपये
मागील बाजूस 50MP Sony Lytia 700C सेन्सर आहे जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह येतो.
सोबत 8MP अल्ट्रावाइड आणि मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
फ्रंट कॅमेरासाठी 32MP सेल्फी कॅमेरा असून तो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग ला सपोर्ट करतो.
Moto AI Imaging Tools व AI Photo Enhancement च्या मदतीने फोटोंचा दर्जा आणखी सुधारला जातो.
या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी असून ती 33W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ऑडिओ अनुभवासाठी Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट
5G, NFC, Bluetooth 5.2, Dual SIM, Wi-Fi, GPS, USB Type-C सारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्याय
3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स
Moto G96 5G हे चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे
Cattleya Orchid
Ashleigh Blue
Greener Pastures
Dresden Blue
1. Moto G96 5G ची किंमत किती आहे?
हा फोन 17,999 रुपये (8GB+128GB) आणि 19,999 रुपये (8GB+256GB) या दोन किंमतीत उपलब्ध आहे.
2. Moto G96 5G कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल?
हा स्मार्टफोन 16 जुलैपासून Flipkart आणि Motorola च्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
3. Moto G96 5G मध्ये कोणता प्रोसेसर वापरण्यात आला आहे?
Moto G96 5G मध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
4. फोनचे खास फीचर्स कोणते आहे?
यामध्ये 144Hz कर्व्ह्ड pOLED डिस्प्ले, 50MP Sony Lytia कॅमेरा आणि Dolby Atmos स्पीकर्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.