Moto Razr 2022 : 50MP कॅमेरा, प्रीमियम डिझाइनसह मिळेल शक्तिशाली प्रोसेसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

moto razr 2022 launched check features and specifications here

Moto Razr 2022 : 50MP कॅमेरा, प्रीमियम डिझाइनसह मिळेल शक्तिशाली प्रोसेसर

Moto Razr 2022 स्मार्टफोन लाँच झाला आहे. कंपनीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लेटेस्ट Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेटसह येतो. फोनमध्ये कंपनी 16 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देत आहे. क्लॅमशेल डिझाईन असलेला हा फोन 50 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे.

मोटोरोलाचा हा फोन नुकताच चीनमध्ये लॉन्च झाला आहे. त्याची किंमत 5,999 युआन (सुमारे 70,750 रुपये) पासून सुरू होत आहे. चीनमध्ये त्याची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू होईल. Moto Razr 2022 येत्या काही आठवड्यांमध्ये भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील लॉन्च केला जाऊ शकतो.

Moto Razr 2022 चे फीचर आणि स्पेसिफिकेशन

फोनमध्ये कंपनी 6.7-इंचाचा POLED डिस्प्ले देत आहे. फुल एचडी + रिझोल्यूशनसह हा डिस्प्ले पंच-होल डिझाइनसह येतो. फोनमध्ये दिलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आहे.Moto Razr 2022 च्या मागील पॅनलवर आणखी 2.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. हा दुय्यम डिस्प्ले मेसेज आणि नोटिफिकेशन्स दाखवण्यासोबत मागील कॅमेराचा व्ह्यू फाइंडर म्हणून काम करतो.

हेही वाचा: सॅमसंगच्या दोन नवीन स्मार्टवॉच लाँच; ECG अन् BP देखील येणार मोजता

फोन 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून, कंपनी त्यात Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला त्यात हॉरिझॉन्टल ड्युअल कॅमेरा सेटअप दिसेल. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये दिलेला प्रायमरी कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह येतो.

त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह हा फोन 3500mAh बॅटरीसह देण्यात आला आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

हेही वाचा: काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

Web Title: Moto Razr 2022 Launched Check Features And Specifications Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology