Moto Edge X | मिळणार सर्वात पावरफु प्रोसेसर अन् 60 MP सेल्फी कॅमेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moto Edge X

लवकरच लॉंच होणार Moto Edge X; मिळेल सर्वात पावरफुल प्रोसेसर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Moto Edge X Launch : Motorola कंपनी सध्या त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto Edge X लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये लॉन्च होणारा हा हँडसेट क्वालकॉमच्या नवीन फ्लॅगशिप चिपसेटसह लॉंच करण्यात येणार आहे. मागील काही रिपोर्ट्सनुसार हा फोन स्नॅपड्रॅगन 898 चिपसेट सह येईल, पण आता एका ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 नावाचा प्रोसेसर देणार आहे.

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या मते, कंपनी पुढील महिन्यात चीनमध्ये दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोन्समध्ये सध्याचे स्नॅपड्रॅगन 8-सिरीज आणि नेक्स्ट-जनरेशन 8 सीरिजचे चिपसेट दिले जाऊ शकतात. असा दावा केला आहे की, मोटोरोला या स्मार्टफोन्ससह स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेट देखील लॉन्च करू शकते. हा फोन स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरने सुसज्ज असेल कोणत्या फीचर्सबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा: Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

मिळू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये ग्राहकांना 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह दिले जाऊ शकते. फोनमध्ये कंपनी 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले देऊ शकते. कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असेल आणि तो 68W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करेल.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते. यात 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सॅमसंग गॅलक्सी A32 चा नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च; पाहा डिटेल्स

loading image
go to top