सॅमसंग गॅलक्सी A32 चा नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च, पाहा किंमत-स्पेसिफिकेशन | Samsung Galaxy a32 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samsung galaxy a32 new 8 gb ram  plus 4 gb vertual ram varient launch see price and specifications

सॅमसंग गॅलक्सी A32 चा नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च; पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सॅमसंगने मल्टीटास्किंग आणखी चांगले करण्यासाठी Samsung Galaxy A32 चे 8GB स्टोरेज वेरियंट लॉन्च केले आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे हा अतिरिक्त 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येईल, म्हणजेच यामध्ये गरजेनुसार फोनची रॅम आपोआप वाढते. या फीचरमुळे, फोनची रॅम 12GB पर्यंत वाढेल, म्हणजेच मल्टीटास्किंग किंवा हेवी गेम्स सर्व सुरळीतपणे चालतील. चला पाहूया फोनची किंमत आणि फीचर्स..

रॅम प्लससह, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या इंटरनल स्टोरेजचा वापर चांगल्या परफॉर्मंससाठी व्हर्चुअल मेमरी म्हणून करू शकता. इंटेलिजेंट मेमरी एक्सपेंशन 4GB एडिशनल व्हर्च्युअल रॅम देते, जी Galaxy A32 ची 8GB मेमरी 12GB पर्यंत वाढवते. यामुळे तुम्ही एकाच वेळी अधिक अॅप्स उघडण्याची आणि अॅप्सची लॉन्च वेळ कमी करु शकता आणि तुमची मल्टीटास्किंग देखील वाढते.

हेही वाचा: मारुतीची नवीन Brezza; सनरूफ, नव्या इंटीरियरसह मिळतील अनेक फीचर्स

कॅमेरा

Galaxy A32 मध्ये 64MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे तसेच हाय क्वालिटी सेल्फी घेण्याकरिता 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, Galaxy A32 मध्ये स्मूथ स्क्रोलिंग, ब्राउझिंग आणि गेमिंगसाठी 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंच FHD+ AMOLED (sAMOLED) Infinity-U स्क्रीन मिळेल ज्यामध्ये डिस्प्ले 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Galaxy A32 त्याच्या एडव्हांस ऑक्टा-कोर MediaTek Helio G80 प्रोसेसरसह बेस्ट परफॉर्मंन्स देतो. तसेच यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी 15W फास्ट चार्जिंगसह मिळते.

Galaxy A32 8GB व्हेरियंटची किंमत

Galaxy A32 8GB+128GB व्हेरियंटची किंमत ही 23499 रुपये आहे आणि रिटेल स्टोअर्स, Samsung.com आणि आघाडीच्या ऑनलाइन पोर्टलवर तो उपलब्ध आहे. Galaxy A32 8GB तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे - Osm Black, Osm Blue आणि Osm Violet.

हेही वाचा: Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

loading image
go to top