
मुंबईत ई-सिम फसवणुकीद्वारे 15 मिनिटांत 4 लाख रुपये चोरीला गेले.
फसव्या लिंकवर क्लिक केल्याने सिम ई-सिममध्ये बदलले आणि गुन्हेगारांना ओटीपी मिळाले.
संशयास्पद लिंक टाळणे आणि मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे आवश्यक आहे.
सायबर गुन्हेगारांनी आता ई-सिम तंत्रज्ञानाचा वापर करून बँक खात्यांमधून पैसे चोरण्याचा नवा मार्ग शोधला आहे. मुंबईतील एका व्यक्तीला याचा फटका बसला असून अवघ्या काही मिनिटांत त्याच्या खात्यातून 4 लाख रुपये गायब झाले. विशेष म्हणजे त्याने एटीएम आणि यूपीआय ब्लॉक केल्यानंतरही ही फसवणूक थांबली नाही. रविवारी संध्याकाळी यूपीआय सेवेत आलेल्या अडथळ्यांमुळे लाखो भारतीयांना त्रास सहन करावा लागला. किरकोळ दुकानांपासून मोठ्या व्यवहारांपर्यंत सर्वच ठिकाणी यूपीआय अयशस्वी झाल्याने सोशल मीडियावर तक्रारी आणि मीम्सचा पूर आला.