आता WhatsApp चॅट कायमस्वरुपी करता येणार म्युट; कंपनीचं नवीन फिचर

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणलं आहे

नवी दिल्ली- व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना चॅट म्युट करता येणार आहे. हे फिचर गेल्या काही महिन्यांपासून ios आणि Android beta ऍपवर टेस्ट करण्यात आले होते. त्यांनंतर याला अॅपमध्ये अपडेट करण्यात आलं आहे. 

व्हॉट्सअॅपमध्ये यापूर्वी वापरकर्त्यांना 8 तास, 1 आठवडा, 1 वर्षापर्यंत चॅट म्युट करण्याचा पर्याय होता. यात चॅट जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत बंद करण्याची सुविधा होती, पण नव्या फिचरमध्ये व्हॉट्सअॅपने 1 वर्षाऐवजी अल्वेज 'Always' असा पर्याय दिला आहे. कायमस्वरुपी म्युटचे ऑपशन मोठे अपडेट नाही, पण ज्या वापरकर्त्यांना काही ग्रुप किंवा एका विशिष्ट व्यक्तीकडून नोटीफीकेशन नको आहेत, त्यांच्यासाठी हा पर्याय फायद्याचा ठरणार आहे.  

Video:अमेरिकेतील प्रचारसभेतही आला पाऊस; कमला हॅरिस यांनी गाजवली सभा

व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर Android आणि iOS डिवाईसमध्ये असणार आहे. ज्यांच्या व्हॉट्सअॅपमध्ये हे नवीन फिचर दिसत नाही, त्यांनी व्हॉट्सअॅप अपडेट करण्याची गरज आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन फिचर घेऊन येत असते. आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी प्रयत्न करताना दिसते.  

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आणखी एक फिचर आणलं होतं. हे फिचर पूर्वीपासूनच व्हॉट्सअॅपमध्ये होतं, पण ते नव्या व्हर्जनमध्ये आणण्यात आलं आहे. यामध्ये मीडिया विंडो अॅड करण्यात आली आहे. यामुळे वापरकर्त्याला फोटो, व्हिडिओ, जीआयफ, डॉक्युमेंट सर्च करता येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mute WhatsApp chats forever New feature introduced

Tags
टॉपिकस
Topic Tags: