Fairy Circles : जगभरातील वाळवंटांमध्ये दिसतायत रहस्यमयी गोलाकार चिन्हं; 'फेअरी सर्कल्स'मुळं वैज्ञानिकही हैराण!

New Research : फेअरी सर्कल सारखे पॅटर्न शोधण्यासाठी एआय आणि सॅटेलाईट इमेजरीचा वापर करण्यात आला
Fairy Circles
Fairy CircleseSakal

जगभरातील वाळवंटामध्ये किंवा ओसाड जमीनींवर रहस्यमयी गोलाकार चिन्हं दिसून येत आहेत. ही चिन्हं नेमकी कशामुळे तयार होतात याचं गूढ वैज्ञानिकांनाही सुटलेलं नाही. पूर्वी केवळ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसणारी ही चिन्हं आता सुमारे 15 देशांमध्ये दिसून आल्यामुळे जगभरातील वैज्ञानिक हैराण झाले आहेत.

गोल चट्ट्यांप्रमाणे दिसणारी ही चिन्हं गेल्या कित्येक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील ओसाड जमीनीवर दिसून येत होती. मात्र, एआयच्या मदतीने केलेल्या नव्या संशोधनानुसार, आता तीन खंडांमधील 15 देशांमध्ये शेकडो जागांवर अशा प्रकारची चिन्हं दिसून आली आहेत. त्यामुळे याचं गूढ आता आणखी वाढलं आहे.

Fairy Circles
Jatinga Valley Mystery: आसाममधलं असं रहस्यमयी गाव, जिथे पक्ष्यांचे थवे एकत्र येऊन करतात आत्महत्या

प्रोसिडिंग्स ऑफ दि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या विज्ञान विषयक जर्नलमध्ये याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. या रिसर्च पेपरचे को-ऑथर एमिलिओ गुईराडो यांनी सांगितलं, की फेअरी सर्कल सारखे पॅटर्न शोधण्यासाठी एआय आणि सॅटेलाईट इमेजरीचा वापर करण्यात आला आहे.

अशी घेतली एआयची मदत

यासाठी न्यूरल नेटवर्क या एआय टूलची मदत घेण्यात आली. संशोधकांनी ऑस्ट्रेलिया आणि नामिबियामधील फेअरी सर्कल्सचे 15 हजारांहून अधिक सॅटेलाईट फोटो न्यूरल नेटवर्कमध्ये अपलोड केले. यातील अर्ध्या फोटोंमध्ये फेअरी सर्कल दाखवले होते, आणि अर्ध्यामध्ये नाही. यानंतर वैज्ञानिकांनी जगभरातील 5,75,000 भूखंडांचे सॅटेलाईट फोटो या एआयला दिले. यातील एक-एक भूखंड सुमारे 2.5 एकर एवढा मोठा होता.

Fairy Circles
Mystery Village Viral News : जगातलं एक रहस्यमयी गाव, इथे फक्त माणसंच नाही तर, पशू-पक्षीही आहेत आंधळे

न्यूरल नेटवर्कने हे फोटो स्कॅन करून, त्यातील फेअरी सर्कलच्या पॅटर्नशी मिळते-जुळते फोटो वेगळे केले. यानंतर जगातील सुमारे 263 ठिकाणी अशा प्रकारची चिन्हं दिसून आली. यामध्ये आफ्रिकेतील साहेल, पश्चिमी सहारा, हॉर्न ऑफ आफ्रिका, मादागास्कर या भागांचा समावेश होता. सोबतच, दक्षिण-पश्चिमी आशिया आणि मध्य ऑस्ट्रेलियाचा देखील समावेश होता.

अधिक संशोधनास वाव

एवढ्या मोठ्या प्रमाणात फेअरी सर्कल्स आढळल्यामुळे आता यामागचं गूढ सोडवता येणार असल्याचा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. ही चिन्हं हवामान बदलाचे संकेत असल्याचंही काही संशोधकांचं मत आहे. याबाबत देखील अधिक संशोधन करता येणार आहे.

Fairy Circles
Death Mystery: 'मी स्वत:ला माझ्या प्रेताजवळ पाहिलं ' मेडिकली डेड घोषित केलेल्या व्यक्तींचे हैराण करणारे अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com