Sunita Williams Health : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर एंट्री! पण त्यांना जडणार 'हे' 5 गंभीर आजार? नासाने केला धक्कादायक खुलासा

Sunita Williams Return to Earth Health Update : अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. मात्र आता त्यांना शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागणार आहे.
Sunita Williams Return to Earth Health Update
Sunita Williams Return to Earth Health Updateesakal
Updated on

Sunita Williams Latest Update : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. 19 मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या; त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत. मात्र, त्यांना परत आल्यावर त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा काही मोठ्या समस्या भेडसावू शकतात.

वजनहीन जीभ

नासाचे अंतराळवीर विल्यम्स आणि विल्मोर यांनाही 'वजनहीन जीभ' (Weightless tongue) नावाची समस्या येऊ शकते. यामध्ये अंतराळवीरांना त्यांची जीभ वजनहीन वाटते. ज्यामुळे बोलण्यात अडचण येऊ शकते.

अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ राहण्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींच्या संख्या कमी होते आणि शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागते. यामुळे 'स्पेस अ‍ॅनीमिया' ही समस्या निर्माण होते.

Sunita Williams Return to Earth Health Update
Sunita Williams Salary : सुनीता विल्यम्सची लागली लॉटरी! 9 महिने अंतराळात राहिल्याबद्दल मिळणार इतके कोटी रुपये, आकडा पाहून व्हाल शॉक

पायांमध्ये होणारे बदल 'बेबी फीट'


अंतराळात जास्त काळ राहिल्यानंतर, अंतराळवीरांच्या पायांचे कोल्ड्ज (calluses) निघून जातात आणि पाय अतिशय संवेदनशील होतात. त्याला 'बेबी फीट' असे म्हटले जाते. त्यामुळे परत पृथ्वीवर येताच त्यांना चालताना अडचणी येऊ शकतात.

डोळ्यांवर परिणाम


अंतराळात दीर्घ काळ राहिल्यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा अंतराळात असताना पाणी मणक्यात जमा होऊ शकते, ज्यामुळे नजर अंधुक होऊ शकते.

Sunita Williams Return to Earth Health Update
ISS : 5 बेडरूमची साईज, 4.5 लाख किलो वजन, कसं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? जिथं 9 महिने अडकल्या सुनीता विल्यम्स, पाहा व्हिडिओ अन् फोटो

हृदयावर होणारा परिणाम


अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे हृदयाची कार्यप्रणाली बदलते यामुळे परत पृथ्वीवर आल्यावर हृदयाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

मानसिक बदल


अंतराळात दीर्घकाळ राहिल्यानंतर, पृथ्वीवर परतल्यावर अंतरिक्षवीरांना मानसिक ताण येऊ शकतो. पृथ्वीवर साधे जीवन सुरू करतांना त्यांना अडचणी येऊ शकतात. अनेक वेळा अंतराळातून परतल्यावर, अंतराळवीरांना "ओव्हरव्ह्यू इफेक्ट" देखील होऊ शकतो. ज्यामध्ये ते पृथ्वीच्या सौंदर्य आणि त्याच्या नाजुकतेला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात.

तसेच या अंतराळवीरांना याहून वेगळे आजार देखील जाडू शकतात कारण एवढे महिने अंतराळात राहून यांची रोगप्रतिकारक शक्ती अगदीच कमी होते. पृथ्वीवर परतल्यावर सुनीता आणि विलमोर यांना विविध स्वास्थ्य तपासण्या कराव्या लागणार आहेत. यामध्ये हाडांची कमजोरी, मांसपेशी आणि हृदयरोगाचे तपासणी होईल.

तब्बल 9 महिने अंतराळात अडकून आता परत आलेल्या या अंतराळवीरांना पृथ्वीवर देखील बराच त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांना पूर्ववत जीवन जगण्यासाठी बराच काळ लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com