esakal | नासाने शोधून काढला पृथ्वीजवळ आलेला १००० वा 'लघुग्रह'
sakal

बोलून बातमी शोधा

Space Station

नासाने शोधून काढला पृथ्वीजवळ आलेला १००० वा 'लघुग्रह'

sakal_logo
By
दीनानाथ परब

वॉशिंग्टन: नासाच्या (nasa) जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेने (Jet Propulsion Laboratory) पृथ्वीजवळून (earth) जाणारा १००० वा NEA म्हणजे लघुग्रह (Asteroid) शोधून काढला आहे. '2021 PJ1' या लघुग्रहापासून पृथ्वीला कुठलाही धोका नाही. या लघुग्रहाच्या छोट्या आकारमानामुळे त्याला शोधून काढणे अत्यंत कठिण होते. रडारच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, हा लघुग्रह ६५ ते १०० फुट रुंद आहे. छोटे आकारमान असूनही या लघुग्रहाची इतिहासात नोंद झाली आहे. कारण पृथ्वीजवळून जाणारा हा १००० वा लघुग्रह आहे.

१ हजारावा लघुग्रह शोधल्यानंतर सात दिवसांनी जेपीएलने १००१ वी पृथ्वीजवळून जाणारी वस्तु शोधून काढली. या वस्तुचे आकारमान आधीच्या वस्तुपेक्षा मोठे होते. या नव्या वस्तुला AJ193 असे टोपणनाव देण्यात आले. पृथ्वीपासून ३४ लाख किलोमीटर अंतरावरुन ही वस्तु गेली.

हेही वाचा: 'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता, महिन्याला देत होता ५० हजार

NEO शोधणारी जागतिक रडार सिस्टिम

2021 PJ1 हा छोटा लघुग्रह आहे. इतक्या छोट्या आकाराचा लघुग्रह लाखो मैल अंतरावरुन जात असताना त्याची अचूक प्रतिमा मिळू शकत नाही. पण ग्रहमालेतील रडार सिस्टिम त्या लघुग्रहाला शोधून अत्यंत अचूकतेने गतीचे मापन करण्याइतपत प्रभावी आहे. त्यामुळे भविष्यात अशा लघुग्रहांबाबत आपले ज्ञान अधिक वाढणार आहे, असे लान्स बेनर यांनी सांगितले. ते नासाच्या लघुग्रह रडार संशोधन कार्यक्रमाचे नेतृत्व करतात.

हेही वाचा: IAF साठी मोठा दिवस, बराक-८ चीन-पाकिस्तानला हवेतच देणार जोरदार प्रत्युत्तर

पृथ्वीजवळून वेगवान गतीने जाणाऱ्या या वस्तुंना रडारमध्ये पकडून त्यांचा अभ्यास करण्यास १९६८ मध्ये सुरुवात झाली. यामुळे अवकाश संशोधकांना NEO कक्षाबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. अशा अभ्यासातून जो डाटा गोळा होता, त्यातून पुढच्या दशकापासून ते शतकापर्यंत अशा कुठल्या वस्तु, लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार, कुठले पृथ्वीला धडकणार त्याचा अत्यंत अचूकतेने अंदाज बांधता येतो.

रडारमार्फत या लघुग्रहाचा आकार, फिरण्याचा वेग, त्याच्यासोबत अजून किती ग्रह आहेत, त्यांची काय स्थिती आहे, याची माहिती मिळते. प्युरटो रिकोमधील अरेसिबो ऑब्सर्व्हेटर इथे बसवण्यात आलेल्या दुर्बीणीमधून निम्मे लघुग्रह शोधून काढण्यात आले. २०२० मध्ये दुर्बीणाचा वापर बंद झाला. कॅनबेरा येथील डीप स्पेस नेटवर्कचा वापर करुन, १४ लघुग्रह शोधून काढण्यात आले.

loading image
go to top