परग्रहावरील जीवन शोधण्यासाठी नासाने शोधली नवी पद्धत

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

न्यूयॉर्क: दुसऱ्या ग्रहांवर जीवन आहे की नाही हे पाहण्यासाठी नासाने नवी आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. अमिको ऍसिडच्या साहाय्याने जीवन निर्माण होण्यासाठी आवश्‍यक घटकांची चाचणी करून द्रव-आधारित तंत्राचा वापर करून जीवन आहे की नाही हे पाहिले जाणार आहे. या पद्धतीला कॅपिलरी इलेक्‍ट्रोफोरेसिस असे म्हणतात, त्याद्वारे सेंद्रिय मिश्रणातून घटक वेगळे करून अनुमान लावले जाईल.

सध्या नासाच्या अवकाश मोहिमातील चंद्रयान वापरत असलेल्या पद्धतीपेक्षा ही पद्धत 10 हजार पट चांगली असून, ती अत्यंत सूक्ष्म फरकाची नोंद घेऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कॅपिलरी इलेक्‍ट्रोफोरेसिस ही पद्धत 80 च्या दशकापूर्वीपासून अस्तित्वात असली तरी परग्रहांवरील समुद्र जगात जीवन शोधण्यासाठी तिचा वापर होऊ शकतो हे पहिल्यांदाच समोर आले आहे.

या तंत्राची चाचणी करण्यासाठी संशोधकांनी कॅलिफोर्नियातील मोनो लेकमधील पाण्याचा वापर केला. यामध्ये अल्कधर्मी घटक अधिक असल्याने त्याचा फायदा झाल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. यासाठी विविध 17 अमिनो ऍसिडवर अभ्यास करण्यात आला असून, ती पृथ्वीवर व इतरही सहज सापडत असल्याने या पद्धतीच्या साह्याने परग्रहांवरील जीवन शोधण्यासही मदत होणार आहे.

Web Title: NASA discovered a new method to find resident alien life