
Asteroid 2025 FA22
esakal
Asteroid 2025 FA22 : सप्टेंबर 2025 मध्ये अंतराळासंबंधित एक दुर्मीळ घटना घडणार आहे. नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) आणि जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) यांच्या नजरेत असलेला ‘2025 FA22’ हा विशाल लघुग्रह (Asteroid) पृथ्वीकडे येत आहे. यंदाच्या सुरुवातीला हवाई येथील पॅन स्टार्स 2 सर्व्हेद्वारे शोधण्यात आलेल्या या खड्ड्याने त्याच्या आकारामुळे आणि पृथ्वीच्या जवळ येण्याच्या घटनेमुळे भारतीयांसह जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे.