NASA: बेडवर पडून राहायचे अन् १५ लाख घ्यायचे, जगातील सर्वात सुखी नोकरी

NASA अशा लोकांच्या शोधात आहे, जे दोन महिने केवळ झोपण्याचे काम करतील. विशेष म्हणजे नासा यासाठी १५ लाख रुपये देत आहे.
Nasa
NasaSakal

Nasa vacancy: जगात वेगवेगळ्या कामासाठी व्यक्तीच्या कौशल्यानुसार पगार दिला जातो. काही व्यक्तींचा पगार खूपच कमी असतो, तर काही व्यक्तींची कमाई लाखो रुपये असते. मात्र, फक्त झोपण्यासाठी लाखो रुपये पगार मिळाला तर? अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA अशा लोकांच्या शोधात आहे, जे दोन महिने केवळ झोपण्याचे काम करतील. विशेष म्हणजे नासा अशा २४ लोकांना १५ लाख रुपयांपेक्षा अधिक पगार देखील देणार आहे.

ज्या लोकांची निवड होईल त्यांना कृत्रिम गुरुत्वाकर्षणात दोन महिने राहावे लागेल. अशा वातावरणात दीर्घकाळ राहिल्यानंतर शरीरावर नक्की काय परिणाम होतात, हे नासाला जाणून घ्यायचे आहे.

Nasa
Recharge Plans: दररोज २.५ जीबी डेटासह येणारे सर्वात स्वस्त प्लॅन्स, डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री

मिळतील तब्बल १५ लाख रुपये

यूरोपियन स्पेस एजेंसी (ESA) आणि NASA चे जर्मन एअरोस्पेस सेंटर हे दोन्ही मिळून कृत्रिम गुरुत्वाकर्षणावर आधारित रेस्ट स्टडी करत आहेत. या अभ्यासात सहभागी होणाऱ्या वॉलिंटियर्सला दोन महिने केवळ बेडवर आराम करण्यासाठी जवळपास १५ लाख रुपये मिळतील.

अंतराळात जाणाऱ्या प्रवासी आणि वैज्ञानिक शून्य-गुरुत्वाकर्षणात काम करतात, ज्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर होतो. नासा पहिल्यांदाच कृत्रिम गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत आहे. या अभ्यासात २४ ते ५५ वर्ष वयोगटातील १२ पुरुष आणि १२ महिला भागा घेतील. यासाठी एक अट देखील आहे. अशा वॉलेंटियर्सला जर्मन भाषा येणे गरजेचे आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

वॉलेंटियर्ससाठी हे खास बेड जर्मन एअरोस्पेस सेंटरच्या एअरोस्पेस मेडिसन इंस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आले आहे. वॉलेंटियर्सला येथे एकूण ८९ दिवस राहावे लागेल. यातील ६० दिवस बेडवर आराम करावा लागेल. या कालावधीत जेवण व इतर कामे बेडवरच करावी लागतील.

हेही वाचा: Safest Cars in India: भारतातील टॉप-5 सुरक्षित कार, अपघातानंतरही चालक-प्रवासी राहतील सेफ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com