
नेपाळ सरकारने फेसबुक, युट्यूब, एक्ससह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोंदणी न केल्यामुळे बंदी घातली आहे.
टिकटॉक, व्हायबरसारख्या काही प्लॅटफॉर्मना नोंदणी केलेली असल्याने बंदीपासून सूट मिळाली आहे.
या निर्णयावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन व सेन्सॉरशिपचा आरोप करत मोठा विरोध होत आहे.
Nepal Digital Strike : नेपाळमध्ये फेसबुक, एक्स आणि युट्यूबसह २३ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. एका वृत्तानुसार, नेपाळ सरकारने गुरुवारी सांगितले की ते फेसबुक, एक्स आणि युट्यूबसह बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक करत आहेत, कारण या कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक असलेल्या नियमांचे पालन केलेले नाही.