
अलीकडच्या काळात इंटरनेटमुळे (Internet) लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. बहुतेक कामं आता इंटरनेटवरच होतात. लोक त्यांचा वेळ ऑनलाइन घालवतात. खरेदीपासून बिल भरण्यापर्यंत सर्व काही आता ऑनलाइन करता येते. खासकरून कोरोना काळात इंटरनेटवरचं लोकांचं अवलंबित्व प्रचंड वाढलं. आता लोक अनेक कामं ऑनलाईन (Online) अगदी सहजतेने करत आहेत. मात्र तरीही लोक याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार (Online transaction) करताना विशेष काळजी घ्यावी लागते. खासकरून डिजीटल व्यवहार (Digital transaction) करताना पासवर्ड अतिशय सावधपणे बनवावा लागतो. नेट बँकिंगसाठी योग्य पासवर्ड (Password) कसा बनवताना काय काळजी घ्यावी. हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Tips to keep in mind when setting your net banking password)
1. पासवर्ड कॉम्प्लेक्स ठेवा-
जेव्हा तुम्ही वेबसाइटसाठी पासवर्ड बनवता. तेव्हा अनेक वेबसाईट तुम्हाला जटील पासवर्ड बनवण्याचा सल्ला देतात. कारण सोपा पासवर्ड सहजतेने हॅक करता होऊ शकतो. यासाठी तुम्ही #,$, %, ^, &,* (, ) इत्यादी विशेष अक्षरांचा वापर करावा. ज्यामुळे तुमचं अकाउंट सहजतेने हॅक होणार नाही.
2. नाव वापरू नका-
Google खाते सारख्या अनेक विश्वासार्ह वेबसाइट तुम्हाला सल्ला देतात की तुमचे नाव तुमच्या पासवर्डमध्ये वापरू नये. तसं केल्यास हॅकरला तुमचा पासवर्ड समजण्यासाठी आणखी कमी मेहनत करावी लागेल. त्यामुळे अशी चूक करणे टाळा.
3. पासवर्ड वेगळा ठेवा-
बर्याच वेळा लोक सर्वत्र आणि एकाधिक खात्यांमध्ये समान पासवर्ड वापरतात. असे करणे अत्यंत धोकादायक आहे. तुमचा पासवर्ड लीक झाल्यास तुम्ही तुमची सर्व खाती रिकामी करून बसाल त्यामुळे प्रत्येक खात्याचा पासवर्ड वेगळा ठेवा.
4. पासवर्ड बदला-
इंटरनेट बँकिंग लॉगिन पासवर्ड वेळोवेळी बदला. असे केल्याने तुमच्या खात्याची सुरक्षा वाढेल. तसेच लॉगिन आणि व्यवहारांसाठी समान पासवर्ड वापरू नका.
5. या गोष्टी घडत असल्यास त्वरित पासवर्ड बदला-
तुम्ही सायबर कॅफेला भेट देऊन किंवा सार्वजनिक डोमेनमध्ये तुमचे इंटरनेट बँकिंग वापरत असल्यास पासवर्ड त्वरित बदलावा. सार्वजनिक नेटवर्क सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप असुरक्षित असतात. काही वेळा तुमचे पासवर्डही त्यात सेव्ह केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.