Netflix Best Plans : तुमच्यासाठी नेटफ्लिक्सचा कोणता प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Netflix best plan which offering ultra hd video quality and 4 screens accessibility

तुमच्यासाठी नेटफ्लिक्सचा कोणता प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

Netflix best plan : जर तुम्ही देखील नेटफ्लिक्स वापरकर्ते असाल आणि त्याच प्लॅनमध्ये तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत चित्रपट पाहण्याचाआनंद घ्यायचा असेल, तर हे शक्य आहे कारण अनेक नेटफ्लिक्स प्लॅन आहेत ज्यामध्ये तुम्हाला मल्टी स्क्रीन ऍक्सेस दिला जातो. या प्लॅनच्या मदतीने तुम्ही एकाच अकाउंटमधून एकाच वेळी अनेक डिव्हाइसेसवर कंटेंट पाहू शकता. आज आपण या प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

सिंगल स्क्रीन आणि सर्वात परवडणारा प्लॅन

जर तुम्ही आत्तापर्यंत नेटफ्लिक्स (Netflix) वापरत नसाल आणि आता त्यावर कंटेंट पाहायचा असेल, तर तुम्ही त्याचा बेसीक प्लॅन निवडू शकता, ज्याची किंमत नुकतीच कमी करण्यात आली आहे, तुम्हाला तो फक्त 149 रुपयांमध्येमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये, तुम्हाला फक्त सिंगल स्क्रीन ऍक्सेस दिला जातो . या प्लॅनसह, तुम्ही फक्त एका डिव्हाइसमध्ये कंटेट डाउनलोड करू शकता, मग तो तुमचा स्मार्टफोन किंवा टॅबलेट असो. या प्लॅनमध्ये, तुम्हाला लॅपटॉप आणि टीव्हीवर नेटफ्लिक्स एक्सेस करता येणार नाही आणि त्याची व्हिडओ क्वालिटी देखील सामान्य असते. मात्र नव्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन खूपच किफायतशीर आहे.

199 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि किंमती कमी होण्यापूर्वी हा बेसिक प्लॅन होता. या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त एका स्क्रीनवर एक्सेस मिळेल. यामध्ये तुम्ही फक्त एकाच डिव्हाइसवरून चित्रपट डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला अमर्यादित चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाईल गेम्स ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोबाईल फोन आणि टॅब्लेटवर चित्रपट पाहाता येतात. जर आपण त्याच्या गुणवत्तेबद्दल बोललो तर ते नॉर्मल असेल.

हेही वाचा: jio चे स्वस्तात मस्त प्लॅन; मिळतो 1.5GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग

499 रुपयांचा प्लॅन

तुम्ही या प्लॅनवर स्विच करताच, तुम्हाला जास्त स्क्रीनमध्ये एक्सेस ऑप्शन मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही दोन स्क्रीनमध्ये चित्रपट पाहू शकता आणि तुम्ही दोन्ही स्क्रीनवरून डाउनलोड देखील करू शकता. या प्लॅनमध्ये अमर्यादित मूव्ही शो आणि मोबाईल गेम्स देखील उपलब्ध आहेत तसेच कमी किमतीच्या प्लॅनचे सर्व फायदे यामध्ये दिलेले आहेत परंतु तुम्ही यामध्ये एचडी क्वालिटीमध्ये व्हिडिओ पाहू शकता.

649 रुपयांचा प्लॅन

हा Netflix चा सर्वात महागडा प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 स्क्रीन ऑफर केल्या जातात आणि त्याच वेळी तुम्ही या चार स्क्रीनच्या मदतीने अमर्यादित डाउनलोड करू शकता. या प्लॅनमध्ये कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये मिळणारे सर्व फायदे दिले जातात तसेच यामध्ये अल्ट्रा HD व्हिडिओ ते HD क्वालिटी व्हिडिओ ऑप्शन मिळतो . या प्लॅनमध्ये तुम्ही लॅपटॉप आणि टीव्हीवर व्हिडिओ पाहू शकता तसेच मोबाइल गेम्स आणि टीव्ही शोचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

Web Title: Netflix Best Plan Which Offering Ultra Hd Video Quality And 4 Screens Accessibility Check Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Netflix
go to top