Netflix Password : शेअरिंग इज नॉट केअरिंग ! नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करणाऱ्यांसाठी वाईट बातमी

जगभरातील सुमारे दहा कोटी नेटफ्लिक्स यूजर्स आपला पासवर्ड इतरांसोबत शेअर करतात.
Netflix Password
Netflix PasswordEsakal

शेअरिंग इज केअरिंग या इंग्रजी म्हणीचा प्रत्यय आपल्याला नेटफ्लिक्स, प्राईम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचे पासवर्ड शेअर करताना नक्की येतो. तुम्हीदेखील असाच आपला नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करत असाल, किंवा दुसऱ्या व्यक्तीचं अकाउंट वापरत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कंपनीने आपली पासवर्ड शेअरिंग पॉलिसी बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

नेटफ्लिक्सने (Netflix) आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जगभरातील सुमारे दहा कोटी नेटफ्लिक्स यूजर्स आपला पासवर्ड इतरांसोबत शेअर करतात. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत असून, नवीन टीव्ही सीरीज किंवा फिल्म बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं.

एकाच कुटुंबात वापरता येणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता एक नेटफ्लिक्स अकाउंट (Netflix account) एकाच कुटुंबातील व्यक्ती वापरू शकणार आहेत. "तुमचं नेटफ्लिक्स अकाउंट हे तुमच्यासाठी आणि तुमच्या घरातील व्यक्तींसाठी आहे" - अशा टॅगलाईनसह नेटफ्लिक्सने अमेरिकेतील सर्व यूजर्सना ईमेल केला आहे. याचा परिणाम अशा सर्व यूजर्सवर होणार आहेत जे आपल्या मित्रांसोबत अकाउंट शेअर करत आहेत.

Netflix Password
OTT platforms : 'खबरदार जर यापुढे...' Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Zee5 ला गंभीर इशारा!

आपल्या कुटुंबीयांव्यतिरिक्त अन्य कोणासोबत अकाउंट शेअर करायचे असेल, तर ७.९९ डॉलर्स/महिना एवढे चार्जेस द्यावे लागणार आहेत. किंवा मग ती व्यक्ती आपले स्वतःचे नवीन अकाउंट सुरू करू शकते. अमेरिकेत लाँच केल्यानंतर काही तासांमध्येच कंपनीने ही पॉलिसी जगभरातील १००हून अधिक देशांमध्ये लागू केली आहे.

कंपनीने यापूर्वी अ‍ॅड-बेस्ड सबस्क्रिप्शन प्लानही लाँच केला होता, ज्याला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्लानचे सध्या ५० लाख सबस्क्राईबर असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच, कंपनीने घेतलेल्या विविध निर्णयांनंतर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सच्या सबस्क्राईबर्सची संख्या २३.२५ कोटी एवढी झाली आहे.

Netflix Password
7 OTT प्लॅटफॉर्म चालतील एका रिचार्जमध्ये, फक्त 49 रुपयांपासून सुरू.

कसे आहेत प्लान्स?

नेटफ्लिक्स (Netflix plans) वार्षिक सबस्क्रिप्शनची सुविधा देत नाही, केवळ मासिक प्लान उपलब्ध आहेत. यातील मोबाईल प्लानची किंमत दरमहा १४९ रुपये आहे, ज्यात तुम्ही केवळ स्मार्टफोनवर नेटफ्लिक्स पाहू शकता. हे एका वेळी एकाच स्मार्टफोनवर चालते. बेसिक प्लानची किंमत १९९ रुपये/महिना आहे. यामध्ये तुम्ही मोबाईल, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही अशा कोणत्याही डिव्हाईसवर नेटफ्लिक्स पाहू शकता. मात्र, एका वेळी यांपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला पाहता येईल.

स्टँडर्ड मासिक प्लानची किंमत ४९९ रुपये आहे, तर प्रीमियम प्लानची किंमत ६४९ रुपये/महिना आहे. प्रीमियम प्लानमध्ये यूजर्सना फोर के रिझॉल्यूशन पर्यंत एकाच वेळी चार डिव्हाईसेसवर नेटफ्लिक्स स्ट्रीम करण्याची सुविधा मिळते.

Netflix Password
नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांनो सावधान! मार्केटमध्ये आलाय नवीन स्कॅम... 'या' फसवणुकीत अडकाल तर खाते होईल साफ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com