नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांनो सावधान! मार्केटमध्ये आलाय नवीन स्कॅम... 'या' फसवणुकीत अडकाल तर खाते होईल साफ

तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट-वेब सिरीजचा आनंद घेत असाल तर सावध व्हा.
Netflix
Netflix Sakal

Cyber Crime: तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट-वेब सीरिजचा आनंद घेत असाल तर सावध व्हा. तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर येऊ शकता. गुन्हेगार सतत फसवणुकीचे नवीन मार्ग शोधत असतात आणि आता एका अहवालात दावा करण्यात आला आहे की त्यांनी नेटफ्लिक्स वापरकर्त्यांचे पेमेंट तपशील चोरण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.

चेक पॉइंट रिसर्चच्या अहवालात नेटफ्लिक्स वापरकर्त्यांची मार्च 2023 मध्ये कशी फसवणूक झाली हे पद्धतशीरपणे स्पष्ट केले आहे. चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मॅनेजर ओमर डेंबिन्स्की हे केवळ फसवणुकीच्या पद्धतीच सांगत नाहीत, तर ते टाळण्याचे मार्गही सुचवतात.

नेटफ्लिक्सच्या नावावर अशाप्रकारे होते फसवणूक:

सायबर गुन्हेगार बनावट ई-मेल पाठवतात. हा मेल अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तो Netflix वरून पाठवला जात आहे. ते (support@bryanadamstribute[.]dk) या मेल वरून मेल करतात. या मेलचा विषय 'अपडेट रिक्वायर्ड-अकाउंट ऑन होल्ड' आहे.

Netflix
Fake iPhone checking Trick : तुम्ही Original च्या लेबलखाली डुप्लीकेट iPhone तर घेतला नाही ना?

यामध्ये वापरकर्त्यांना सांगण्यात येते की पुढील बिलिंगचे पैसे भरण्याची अधिकृतता संपलेली आहे आणि त्यामुळे नेटफ्लिक्स खाते निलंबित करण्यात आले आहे.

त्यानंतर त्यात एक लिंक आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन रिन्यू करण्यास सांगितले जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर, अशी वेबसाइट उघडते ज्यावर पेमेंटशी संबंधित संपूर्ण तपशील चोरीला जातो.

असे सुरक्षित रहा:

ओमर डेंबिन्स्कीच्या मते, हे टाळण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे जागृक असणे. असा कोणताही मेल आल्यास, सर्वप्रथम तुमचे नेटफ्लिक्स अॅप उघडा आणि तेथे सबस्क्रिप्शन स्टेटस तपासा.

याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मेल किंवा एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. डेंबिन्स्की म्हणाले की, चुकीचे शब्दलेखन केलेले डोमेन, टायपो, चुकीच्या तारखा इत्यादी संशयास्पद मार्ग शोधण्यासाठी कर्मचार्यांना योग्यरित्या प्रशिक्षित केले पाहिजे.

Netflix
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com