CNG कार खरेदीसाठी आणखी एक पर्याय, Tata Tiago सीएनजीची प्री-बुकिंग सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Tiago CNG

CNG कार खरेदीसाठी आणखी एक पर्याय, Tata Tiago सीएनजीची प्री-बुकिंग सुरु

नवी दिल्ली : सीएनजी सेगमेंटमधील संधीची शक्यता पाहता टाटा मोटर्सने (Tata Motors) आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. कंपनी या महिन्यात Tata Tiago आणि Tata Tigor ची सीएनजी व्हेरिएंट लाँच करणार आहे. या अगोदर निवडक डिलरशीपवर Tata Tiago CNG ची प्री-बुकिंगही सुरु केली आहे. मात्र अधिकृतपणे अद्याप याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.

सीएनजीमध्ये उपलब्ध होईल टाटांचे हे कार्स

मीडिया वृत्तांनुसार अगोदर निवडक डिलरशीपवर टाटा टिआगो सीएनजीची बुकिंग सुरु आहे. त्यासाठी वितरक आपापल्या हिशेबानुसार चार्ज करित आहेत. बुकिंग रक्कम डिलरशीपनुसार पाच हजारांपासून २० हजारांदरम्यान आहे. कंपनी या दोन माॅडल्स व्यतिरिक्त येणाऱ्या काळात टाटा नेक्सन, टाटा पंच आणि टाटा अलट्रोझला ही सीएनजी ऑप्शनसह सादर करण्याच्या तयारीत आहे. (Tata Tiago CNG Pre Booking Open Befor Launching)

हेही वाचा: Avan Motorsची इलेक्ट्रिक स्कूटर, एकदा चार्ज केल्यावर धावते १०० किलोमीटर

टाटा टिआगो सीएनजीचे फिचर्स

प्री-बुकिंगसाठी निवडक डिलरजवळ टाटा टिआगोचे रिअर विंडशील्डवर iCNG बॅच पाहण्यात आले आहे. टाटा टिआगो किंवा टाटा टिगोरच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना सर्व फिचर्स मिळतील जे पेट्रोल व्हेरिएंटमध्ये असतात. विंडस्क्रिनवर सीएनजीचे बॅचशिवाय कोणतेही बदल होणार नाही.

किंमत

टाटा टिआगो आणि टाटा टिगोरचे सीएनजी व्हेरिएंटची किंमती पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत ३० हजारांपासून ५० हजारांपर्यंत महागडी असू शकतो. टाटा टिआगोची पेट्रोल व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत दिल्लीत ४.९९ लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच टाटा टिगोरची पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत एक्स शोरुममध्ये ५.६७ लाख रुपये आहे.

हेही वाचा: Tata ची कोणती कार आहे बेस्ट? वाचा सर्व कार्सच्या किंमती-मायलेज

मारुती आणि ह्युंदाईला देणार टक्कर

सीएनजी सेगमेंटच्या बाजारात टाटाची स्पर्धा मारुती सुझुकी आणि ह्युंदाईशी होणार आहे. आता सीएनजी सेगमेंटमध्ये मारुतीचा दबदबा आहे. या सेगमेंटमध्ये मारुती आठ सीएनजी माॅडल्ससह ८२ टक्के वाटा आहे. बाकी २० टक्क्यांवर ह्युंदाईचा वाटा असून ती सीएनजी ऑप्शनमध्ये चार माॅडल्स विकत आहे.

Web Title: Tata Tiago Cng Pre Booking Open Befor Launching

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tata Motors
go to top