आता Skin Color संबंधीत आजारांवरील उपचार होतील सोपे, संशोधनात नव्या जनुकांचा शोध

भारतीय वंशाचे संशोधक विवेक बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका संशोधनात संशोधकांना पिगमेंटेशनशी संबंधित 135 नवीन जनुकांची ओळख पटली आहे
त्वचेच्या रंगाबाबत नवा शोध
त्वचेच्या रंगाबाबत नवा शोधEsakal

भारतातचं नव्हे तर जगभरातील प्रत्येक व्यक्तीचा रंग हा वेगवेगळा आढळतो. केवळ त्वचेचाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचा केसांचा रंग तसंच डोळ्यांच्या Eyes Color रंगामध्ये भिन्नता आढळते. New Innovation Indian Origin Scientist Vivek Bajpayee found new genes to know skin pigmentation

व्यक्तीच्या त्वचेच्या तसंच केस आणि डोळ्यांच्या रंगासाठी Skin and Eyes Color मेलेनिन हा घटक जबाबदार असतो. हा घटक एक प्रकारचं रंगद्रव्य असून ते प्रकाशाचं Light अवशोषण करण्याचं काम करतं.

भारतीय वंशाचे संशोधक विवेक बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका संशोधनात संशोधकांना पिगमेंटेशनशी Pigmentation संबंधित 135 नवीन जनुकांची ओळख पटली आहे. या नव्या जनुकांमुळे त्वचारोग आणि इतर पिगमेंटेशनसंबंधीत रोगांवर औषध निर्माण करणं सोपं जाणार आहे.

या नव्या शोधामुळे मेलेनिन रेग्युलेट होण्याची प्रक्रिया समजून घेतल्यास मेलानोमा किंवा त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव करणं सोप जाऊ शकतं असं संशोधकांचं म्हणणं आहे.

प्रत्येक व्यक्तीचा रंग वेगळा असण्याचं कारण

शास्त्रज्ञ विवेक बाजपेयी यांच्या मते या नवीन मेलेनिन जनुकांना लक्ष्य केल्यास, त्वचारोग आणि इतर पिगमेंटेशन रोगांसाठी मेलेनिन सुधारणारी औषधे देखील विकसित करणं शक्य आहे. अभ्यासानुसार मेलेनिनचं उत्पादन हे मेलानोसोम नावाच्या विशेष संरचनेत होत असंतं.

मेलानोसोम हे मेलेनिन उत्पादक रंगद्रव्य पेशींमध्ये आढळतात. यांना मेलानोसाइट्स म्हंटलं जातं. सर्व व्यक्तींमध्ये ही मेलानोसाइट्सची संख्या सारखीच असली तरी त्यांच्याद्वारे निर्माण करण्यात आलेल्या मेलेनिनचं प्रमाण मात्र वेगवेगळं असतं. यामुळेच प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग वेगवेगळा असतो.

हे देखिल वाचा-

त्वचेच्या रंगाबाबत नवा शोध
Skin Care Tips: वृद्धापकाळात फ्रेश आणि तरुण दिसायचंय? मग सकाळी करा या ५ गोष्टी, चेहरा उजळेल

या अभ्यासामध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमामध्ये असिस्टंट प्रोफेसर असलेल्या विवेक बाजपेयी यांनी त्यांच्या टीमसोबत प्रत्येक व्यक्तीमध्ये मेलेनिनचं प्रमाण वेगवेगळं असण्याचं कारणं शोधण्यासाठी सीआरआइपीआर-सीएएस9 CRISPR-CAS9 या तंत्रज्ञानाचा वापर केला. CRISPR तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी लाखो मेलेनोसाइट्समधून २०,००० हून अधिक जनुकं पद्धतशीरपणे काढली आणि मेलॅनिन उत्पादनावर होणारा परिणाम पाहिला.

१३५ नव्या जनुकांचा शोध

विवेक बाजपेयी यांच्या टीमने इन-व्हिट्रो सेल कल्चरद्वारे मेलानोसाइट्स निर्मितीची क्रिया आणि प्रमाण यांचा अभ्यास केला. बाजपेयी यांनी विकसित केलेल्या साइड स्कॅटर ऑफ फ्लो सायट्रोमेट्री या नव्या प्रक्रियेमुळे कमी किंवा जास्त मेलेनिन तयार करणाऱ्या पेशींची ओळख पटवता आली. या नव्या शोधामध्ये १६९ जीन मेलेनिन उत्पादनावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून आलं. यापैकी १३५ जीन्स यापूर्वी ज्ञान नव्हते.

या अभ्यासामध्ये विकसित करण्यात आलेलं आणि वापरलेले तंत्रज्ञान बुरशी आणि जीवाणूंमध्ये मेलेनिन उत्पादनाचं नियमन करणाऱ्या जनुकांना ओळखण्यासाठी देखील उपयोगी पडू शकतं. यामुळे माणसांसोबत पिकांवरील रोगांवर औषधोपचार विकसित केले जाऊ शकतात.

एकंदर या नव्या शोधामुळे त्वचेच्या रंगांसंबधीत निर्माण होणाऱ्या रोगांवर औषध निर्मिती करणं किंवा योग्य उपचार पद्धती विकसित करणं आता सोयीचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com