New Smartphone : बजेट फोन विकत घेताय? १० हजारांच्या आत मिळतील या ब्रँड्सचे स्मार्टफोन

स्मार्टफोन अगदी १० हजार रुपयांच्या आत देखील येत असल्याचं दिसून येत आहे
New Smartphone
New Smartphone esakal

New Smartphone : तुम्हालाही नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल पण तुमचं बजेट कमी आहे. अशावेळी नव्या, जुन्या अशा साऱ्या कंपन्या म्हणजेच वेगवेगळे ब्रँड्स वेगवेगळे फीचर्स घेऊन नवनवीन फोन्स घेऊन येत आहेत.

New Smartphone
Marathi Tech Portal : सोलापूरच्या सूरज बागलांच्या ‘मराठी टेक पोर्टल’ची सातासमुद्रापार कीर्ती

त्यामुळे मार्केटमध्ये चुरसही वाढली आहे. हीच वाढती रेस पाहता अनेक दमदार ब्रँड्स स्वस्तात मस्त फोन घेऊन येत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन अगदी १० हजार रुपयांच्या आत देखील येत असल्याचं दिसून येत आहे.

New Smartphone
Car Tips : कार चालवतांना अचानक क्लच अडकतोय? या टिप्स करतील १००% मदत...

आता तुम्हीही आपल्या जुन्या स्मार्टफोनवरुन अपग्रेड होण्यासाठी नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय आणि तुम्हालाही कमी बजेटमध्ये हा नवीन स्मार्टफोन हवा असेल तर तुमच्यासाठी काही खास ऑप्शन्स आम्ही घेऊन आलो आहोत.

New Smartphone
Popular Celebrities Electric Cars : या 10 सेलिब्रिटींकडे आहेत कोट्यवधींच्या इलेक्ट्रिक कार

Moto G13

या यादीतील पहिला फोन म्हणजे फार जुनी मोबाईल कंपनी मोटोरोलाचा. कंपनीचा Moto G13 हा फोन ९,९९९ रुपयांना येत असून विशेष म्हणजे यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. Helio G85 चिपसेट G13 ला पॉवर करतो आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि नवीनतम Android 13 चालतो.

New Smartphone
Tata Cars : टाटा कंपनीनं वाढवल्या कार्सच्या किंमती, नेक्सॉनसह या कार्स 1 मे पासून होणार महाग

​Redmi 12C

सध्या आघाडीला असणारी स्मार्टफोन कंपनी रेडमीचा Redmi 12C हा एक १० हजााच्या आतील चांगला ऑप्शन आहे. 6.71-इंचाचा डिस्प्ले असणारा हा फोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. Helio G85 चिपसेट या फोनमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. तसंच 50MP कॅमेरा आहे.

New Smartphone
क्रिकेट मैदानात Apple च्या सीईओंसोबत सोनम कपूरचं फोटो सेशन; पाहा ग्लॅमरस लूक

Realme C33

Realme C33 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. C33 Unisoc T612 चिप या फोनमध्ये बसवण्यात आली आहे. तसंच जर फोनच्या मेमरीचा विचार कराल तर यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. याशिवाय स्मार्टफोनमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कॅमेरा. या फोनमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसंच 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

New Smartphone
Health Tips : दिवसभरात किती चपात्या खाव्यात?

Lava Blaze 2

लावा कंपनीचे फो अधिक वापरले जात नसले तरी कमी बजेट असणाऱ्यांसाठी हे फोन भारीच आहेत. तर लावा कंपनीचा Lave Blaze 2 या मॉडेलमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. ज्यात Unisoc T616 चिप आहे. तसंच 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये 13MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

New Smartphone
विमान प्रवासात मोबाइल फ्लाईट मोडवर का ठेवतात? : Airplane Travel

​Poco C55

पोको कंपनीचे फोनही आजकाल चांगले विकले जात आहेत. या फोन्समध्ये गेमिंगचा अनुभव चांगला येत असल्याचं दिसून येत आहे. तर पोकोचा POCO C55 हा देखील एक १० हजारांच्या आतील चांगला ऑप्शन आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.71 इंचाचा डिस्प्ले आहे आणि तो 128GB पर्यंत स्टोरेज आणि 6GB रॅमसह MediaTek Helio G85 चिपसेट बसवला आहे. यात 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com