NISAR Launch : इस्रो-नासासाठी ऐतिहासिक दिवस! ‘निसार’ उपग्रह उड्डाणासाठी सज्ज; इथे पाहा थेट प्रक्षेपण

GSLV F-16 NISAR Mission Launch Streaming : भारत-नासा यांचे संयुक्त निसार मिशन आज श्रीहरिकोटामधून अंतराळात झेपावणार आहे. पृथ्वीवरील बदल टिपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या उपग्रहावर जगभराचे लक्ष आहे.
GSLV F-16 NISAR Mission Launch Streaming
GSLV F-16 NISAR Mission Launch Streamingesakal
Updated on

NISAR Satellite Update : भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आणि अमेरिकेच्या नासाने (NASA) संयुक्तपणे विकसित केलेले ‘निसार’ (NISAR - NASA ISRO Synthetic Aperture Radar) मिशन आज दुपारी ५:४० वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे. या ऐतिहासिक प्रक्षेपणासाठी साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

सुमारे १० वर्षांच्या परिश्रमातून आणि १.५ अब्ज डॉलर्सच्या खर्चातून तयार झालेल्या निसार मिशनमध्ये भारत व अमेरिकेच्या शास्त्रज्ञांची संशोधनातील ताकद एकवटली आहे. ही दोन्ही संस्थांची एकत्रितपणे आजवरची सर्वात खर्चिक आणि महत्त्वाची मोहीम मानली जात आहे.

मिशनचे उद्दिष्ट काय?
निसार मिशनचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील भूभाग आणि हिमनद्या यांच्यातील हालचाली, भू-संरचना, समुद्र किनारे, बेटं, समुद्रातील बर्फ आणि विशिष्ट महासागर क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांचा अत्याधुनिक रडार प्रणालीद्वारे अभ्यास करणे हा आहे. हे निरीक्षण दर १२ दिवसांनी केले जाणार आहे, त्यामुळे पृथ्वीच्या हवामान बदलांचा, भूकंप, वाळवंटीकरण यांसारख्या प्रक्रियांवर संशोधनासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.

GSLV F-16 NISAR Mission Launch Streaming
Mobile Launch August 2025 : ऑगस्टमध्ये स्मार्टफोन प्रेमींसाठी पर्वणी; लाँच होणार 'हे' 5 ब्रँड्स मोबाईल, किंमत अन् दमदार फीचर्स पाहा
  • इस्रोने या मिशनसाठी GSLV-F16 प्रक्षेपण यान, उपग्रह रचना, S-बँड रडार प्रणाली, डेटा हाताळणी यंत्रणा आणि हायस्पीड डाऊनलिंक यंत्रणा विकसित केली आहे.

  • नासाने L-बँड रडार, एक सॉलिड स्टेट रेकॉर्डर, जीपीएस रिसीव्हर, दुसरी डाऊनलिंक प्रणाली आणि एक ९ मीटर लांबीचा बूम (जे १२ मीटर रडार परावर्तकाला आधार देतो) तयार केला आहे.


उपग्रह उड्डाणानंतर अवकाशात १८ मिनिटांत सोडला जाईल. त्यानंतर हे मिशन चार टप्प्यांमध्ये काम करणार आहे

  1. लॉन्च (उड्डाण)

  2. डिप्लॉयमेंट (उपग्रह विस्तार) – यामध्ये नासाने तयार केलेला १२ मीटरचा रडार परावर्तक ९ मीटरच्या बूमच्या सहाय्याने उघडला जाईल.

  3. कमिशनिंग (परीक्षण) – ९० दिवस चालणाऱ्या या टप्प्यात सर्व यंत्रणांची तपासणी आणि चाचण्या केल्या जातील.

  4. सायन्स ऑपरेशन्स (वैज्ञानिक निरीक्षण) – यामध्ये नियमित रडार निरीक्षण, कक्षाबदल आणि इस्रो-नासा समन्वयातून डेटा संकलन होईल.

GSLV F-16 NISAR Mission Launch Streaming
Kinetic Scooter : काइनेटिक DX आणि DX+ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त..

थेट प्रक्षेपण कसे पाहावे?
ही ऐतिहासिक झेप तुम्ही घरबसल्या पाहू शकता. इस्रो आणि नासा दोघेही हे प्रक्षेपण थेट प्रक्षेपणद्वारे (LIVE STREAMING)दाखवणार आहेत. (NISAR LAUNCH LIVE STREAMING)

FAQs

1. What is the purpose of the NISAR mission?
निसार मिशनचा उद्देश म्हणजे पृथ्वीवरील भूभाग, हिमनद्या, महासागर आणि पर्यावरणातील बदलांचा रडारद्वारे सखोल अभ्यास करणे.

2. Who developed the NISAR satellite?
हा उपग्रह इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे सुमारे १० वर्षांच्या संशोधनातून विकसित केला आहे.

3. When and where will NISAR be launched?
निसार मिशन ३० जुलै २०२५ रोजी श्रीहरिकोटा येथून दुपारी ५:४० वाजता प्रक्षेपित होणार आहे.

4. How can I watch the NISAR launch live?
इस्रो आणि नासाच्या अधिकृत वेबसाइट्सवर तसेच इंडिया टुडे सायन्सवर या प्रक्षेपणाचे थेट प्रसारण पाहता येईल.

5. What is special about the radar used in NISAR?
या उपग्रहात दोन प्रकारचे रडार (S-band व L-band) वापरले असून ते उच्च रिझोल्युशनमध्ये पृथ्वीवरील प्रत्येक हालचाल टिपू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com