Noise Buds VS204 : भारतात लॉंच झाले १० तास बॅटरी लाइफ देणारे इअरबड्स; किंमतही बजेटमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Noise Buds VS204

भारतात लॉंच झाले १० तास बॅटरी लाइफ देणारे इअरबड्स; किंमतही बजेटमध्ये

Noise ने आपले नवीन इयरबड्स Noise Buds VS204 भारतात लॉन्च केले आहेत. हे कंपनीचे लेटेस्ट एअरबड्सची किंमत ही तुमच्या खिशाला परवडणारी असून हे TWS इयरफोन आहेत. या ऑडिओ डिव्हाइसमध्ये तुम्हाला जास्त काळ चालणारी बॅटरी, ENC, फास्ट कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत.

नॉईज बड्स VS204 मध्ये स्टेम आणि किंचित अँगल्ड सिलिकॉन इअर टिप्ससह इन-इअर डिझाइन देण्यात आले आहे. हे IPX4-रेट केलेले आणि वॉटर रेसिस्टंट आहेत. वापरकर्ते म्यूजीक प्लेबॅक कंट्रोल करण्यासाठी इअरबडवर टॅप करू शकतात, कॉलला उत्तर देऊ/नाकारू शकतात आणि व्हॉइस असिस्टंट ट्रिगर करू शकतात. चला तर मग या इअरबड्सची किंमत किती आहे आणि यामध्ये काय खास आहे, जाणून घेऊया सविस्तर...

केस उघडताच फोन होईल कनेक्ट

नॉईज बड्स VS204 पावरफुल बास आणि इमर्सिव्ह संगीतासाठी 13 मिमी डायनॅमिक ड्रायव्हरसह सुसज्ज आहेत. हे AI इनव्हारमेंटल नॉइज कॅन्सलीशन (ENC) सह येतात जे कॉलवर क्लिअर क्वालिटीसह आसपासचा गोंगाट आवाज रोखतात. TWS इयरफोन्समध्ये HyperSync तंत्रज्ञान आहे जे तुम्ही केस लिड उघडताच कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनशी कनेक्ट होतील असा दावा केला जातो. ऑडिओ डिव्हाइस ब्लूटूथ 5.2 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.

एकूण 50 तासांची बॅटरी लाइफ

Noise Buds VS204 USB-C पोर्टसाठी सपोर्ट असलेल्या स्टोरेज आणि चार्जिंग केससह येतात. कंपनीचा दावा आहे की ते एकूण 50 तासांचे बॅटरी लाइफ देतात आणि प्रत्येक इयरबड एका चार्जवर 10 तासांचा प्लेटाइम ऑफर करतो. ब्रँडचा दावा आहे की 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये इयरबड 120 मिनिटे टिकतात.

हेही वाचा: राहुल गांधींची चिमुरडीला चप्पल घालायला मदत, भारत जोडो यात्रेचा Video Viral

किंमत आणि उपलब्धता

नवीन नॉईज बड्स VS204 इयरबड्सची किंमत भारतात 1,599 रुपये आहे आणि मिंट ग्रीन, स्पेस ब्लू, जेट ब्लॅक आणि स्नो व्हाईट रंग पर्यायांमध्ये ऑफर केली गेली आहेत. हे ब्रँडच्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि Flipkart वरून खरेदीसाठी उपलब्ध असतील.

हेही वाचा: Chandigarh University Case: आरोपी विद्यार्थिनीनंतर शिमल्यातून तरुणाला अटक

Web Title: Noise Buds Vs204 With 10 Hour Battery Life Launched In India Check Price Features

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..