नोकियाचा 'स्नेक गेम' आता फेसबुकवरही 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कॅलिफोर्निया - नोकियाच्या मोबाईमध्ये असणारा स्नेक गेम चांगलाच लोकप्रीय झाला होता. हाच स्नेक गेम आता फेसबुकवरही खेळता येणार आहे.

स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकियाचे फोन मागे पडले. त्याबरोबरच स्नेक गेमही विस्मृतीत गेला. कँडी क्रश, पॉकेमॉन सारखे गेम्स चांगलेच लोकप्रीय असताना, आता स्पर्धेत नव्याने उतरण्यासाठी सज्ज झालेल्या नोकियाने या नव्या आणि जुन्या वर्गाला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. 

हा गेम फेसबुकवर उपलब्ध होणार असल्याने आता फक्त नोकिया धारकांनाच नाही तर फेसबुक युजर्सनाही हा गेम खेळता येणार आहे. भारतातले फेसबुक मेसेंजर इन्टन्ट गेम फिचर्सला सपोर्ट करत नसल्याने, भारतीयांना मात्र नेहमीसारखीच गेम खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: Nokia’s iconic Snake game is now on Facebook