'नोकिया 1' भारतात लॉन्च!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

या मोबाईलमध्ये गुगल अॅप्स व गुगल सर्व्हिसेस उदा. जीमेल गो, गुगल मॅप्स गो हे लाईटवेट व्हर्जनमध्ये उपलब्ध असतील. नोकिया 1 चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी स्वस्त दरात हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल.

नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा काही निवडक स्मार्टफोनपैकी आहे, जो अँड्रोइड ओरिओ (गो एडिशन) वर चालेल. 

 nokia 1

या मोबाईलमध्ये गुगल अॅप्स व गुगल सर्व्हिसेस उदा. जीमेल गो, गुगल मॅप्स गो हे लाईटवेट व्हर्जनमध्ये उपलब्ध असतील. नोकिया 1 चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी स्वस्त दरात हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. नोकिया 1 ची किंमत भारतात 5,499 रूपये इतकी असेल. भारतातील सर्व मोबाईल विक्रेत्यांकडे हा फोन उपलब्ध असेल. 

नोकिया 1 - स्पेसिफीकेशन्स :
नोकिया 1 हा ड्युअल सीम असून, 4.5 इंच इतकी त्याची स्क्रीन डिस्प्ले असेल. यात 1.1 गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर मीडियाटेक एमटी 6737 एम प्रोसेसर व 1 जीबी रॅम आहे. बॅक कॅमेरा हा एलईडी फ्लॅश लाईटसह 5 मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. 

नोकिया 1 मध्ये 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, जे 128 जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे. या स्मार्टफोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक असे अनेक फीचर्स आहेत. त्याशिवाय यात एक्सीलेरोमीटर, अॅम्बियंट लाईट सेंन्सर व एक प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. मोबाईलमध्ये 2150 एमएएचची बॅटरी आहे ज्यामुळे मोबाईल 9 तास टॉक टाईमसाठी व 15 तास स्टँडबाय राहण्याचा दावा केला आहे.  

हा स्मार्टफोन डार्क ब्लू व वार्म रेड या रंगात मिळेल. तसेच याचे कव्हरही ग्रे व पिवळ्या रंगात उपलब्ध होतील जी पुढील महिन्यापासून विक्रीसाठी बाजारात येतील. याची किंमत साधारण 450 रूपये इतकी असेल. हा मोबाईल रिलायन्स जियोने कॅशबॅक ऑफरमध्ये ठेवला आहे, ज्यात 2,200 रूपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय 60 जीबी 4जी डेटासुद्धा मिळेल.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nokia 1 launch in india