Nokia 6.1 झाला 10 हजारांनी स्वस्त!

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

- तब्बल 10 हजारांनी Nokia 6.1 झाला स्वस्त.

नवी दिल्ली : Nokia 6.1 या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 10 हजारांनी कपात करण्यात आली. Nokia इंडियाने या फोनची नवी किंमत आज जाहीर केली. Nokia 6.1 या फोनची लाँचिंगवेळी 16,999 रुपये किंमत होती. आता या फोनची किंमत 6,999 रुपये झाली. 

Nokia कंपनीने मागील वर्षी एप्रिल महिन्यात Nokia 6 आणि Nokia 6.1 हे दोन फोन्स लाँच केले. Nokia 6.1 लाँच झाला तेव्हा या फोनची किंमत 16,999 रुपये होती. मात्र, आता हा फोन 6,999 रुपयांना मिळणार आहे. तर 4GB/64GB चा हा फोन लाँच झाला तेव्हा या फोनची किंमत 18,999 होती. मात्र, आता या फोनची किंमतही कमी करण्यात आली आहे. हा फोन 9,999 रुपयांना मिळणार आहे.

दरम्यान, नव्या किमतीचे मोबाईल खरेदी करायचे असल्यास ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येऊ शकतील. याबाबतची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nokia 6 point 1 gets a price cut in India by 10 Thousand