खुशखबर! Apple नं घेतला मोठा निर्णय; आता iPhone 12 भारतात होणार असेम्बल; जाणून घ्या 

Now Apple iphone 12 will be assemble in India
Now Apple iphone 12 will be assemble in India

नागपूर : भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जिथे सर्वाधिक प्रमाणात स्मार्टफोन विकले आणि खरेदी केले जातात. त्यामुळे जगभरातील मोठमोठ्या स्मार्टफोन्स कंपन्यांचा डोळा हा भारतीय बाजारावर असतो. म्हणूनच आता Apple ने एक मोठी माहिती दिली आहे की Apple भारतात  iPhone 12 ची असेंब्ली सुरू केली आहे. यामुळे Apple कंपनी जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजारात उत्पादन कार्यात गगती आणणार आहे. 

"आमच्या स्थानिक ग्राहकांसाठी भारतात iPhone 12 चे उत्पादन सुरू केल्याचा आम्हाला अभिमान आहे." Apple कंपनीकडून कुठल्याही मोबाईलची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर करण्यात आले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार फॉक्सकॉन या कंपनीला भारतात iPhone 12 ची निर्मिती करण्यास कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे   

फॉक्सकॉनने यावर काहीही प्रतिसाद दिला नाही, परंतु यापूर्वी त्यांनी नमूद केले आहे की ते क्लायंट विशिष्ट कामांवर भाष्य करत नाहीत. 

व्हॉशिंग्टन आणि बीजिंग या दोन शहरातील व्यापार युद्धामुळे Apple च्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच Apple मुळे या युद्धाला चालना मिळत आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणूनच कंपनीने उत्पादन जगातील इतर काही भागात वळवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की फॉक्सकॉन नोव्हेंबरमध्ये चीनमधून व्हिएतनामला काही आयपॅड आणि मॅकबुक घेऊन गेली होती. 

याला Apple कडून एक मोठे पाऊल म्हटले जाऊ शकते कारण भारत आधीच Wistron वरून आयफोनचा पुरवठा 2001 पासून करत आहे. मात्र असे प्रथमच घडत नाहीये, यापूर्वी भारतात बरेच आयफोन्स झाले आहेत. पण आता फॉक्सकॉनसह भारतात आयफोनचे उत्पादन कंपनीकडून मोठे पाऊल मानले जात आहे. 

फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि पेगट्रॉन या तिसर्‍या पुरवठादार कंपनीने भारतात आयफोन मॉडेल्स तयार करण्यासाठी पाच वर्षात मिळून सुमारे 6,540 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आता या नवीन भारतात असेम्ब्ल झालेल्या आयफोनची किंमत वाढते की कमी होते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com