'ॲपल पे' युझरसाठी खुशखबर! आता वापरता येणार बिटकॉईन, कसे? वाचा सविस्तर

Now apple pay users can spend bitcoins Marathi story
Now apple pay users can spend bitcoins Marathi story

जगभरात सर्रास वापरली जाणारी क्रिप्टो करन्सी बिटकॉईनबद्दल अद्याप भारतीयांमध्ये साशंकता आहे. जगभरातील कंपन्या  मात्र हे आभासी चलन स्विकारताना दिसून येत आहेत. जगभरातील अनेक कंपन्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे.  यातच आयफोन बनवणारी जगप्रसिध्द कंपनी 'ॲपले'ने त्यांच्या वापरकर्त्यांना सुखद धक्का देत क्रिप्टो करन्सी वापरासंबधी खास सुविधा देण्याची तयारी सुरु केली आहे. आता ॲपल वापरकर्ते बिटकॉईन ही क्रिप्टोकरेंसी 'ॲपल पे' या ॲपमधून वापरू करु शकणार आहेत. 

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या  'Phone Arena' च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की बिटकॉइन सह इतरही क्रिप्टो करन्सीच्या वापराकरिता ऍपल पेमेंट ॲप वापरता येणार आहे. त्यानुसार ॲपल वापरकर्त्यांना  'बीट पे' हे ॲप वापरुन बिटकॉईन खरेदी करण्यासोबतच 'ॲपल पे' ॲपच्या प्रीपेड मास्टरकार्डचा वापर करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. आता 'बीट पे' वॉलेट हे 'ॲपल वॉलेट' आणि 'ॲपल पे' या दोन्हीला जोडता येणार आहे. 

'बीट पे' काय आहे?

क्रिप्टो करन्सी वापरासाठी हे महत्वाचे साधन असून 'बीट पे' हे सर्वात मोठे क्रिप्टो पेमेंट प्रोसेसर आहे. ज्याद्वारे क्रिप्टो करन्सी विक्री -खरेदी करणाऱ्या दोघांना व्यवहार करणे शक्य होते. ॲपलच्या या भागीदारीमुळे कंपनीचे  वापरकर्ते क्रिप्टो करन्सी वापरुन व्यवहार करु शकतील. 'बीट पे' वॉलेट हे ॲप फक्त बिटकॉईनच नाही तर इतर क्रिप्टो करन्सी जसे की ईथर, बिटकॉईन कॅश यासोबतच यूएसजी कॉईन, जेमिनी डॉलर, पैक्सोस स्टैंडर्ड आणि बिनेंस यूएसडी  यांच्यासोबत देखील काम करते.

कुठे असेल ही सुविधा?

गुगल प्ले स्टोअरच्या माहितीनुसार, कोणताही वापरकर्ता क्रिप्टो करन्सी वापरासाठी 'बीट पे' कार्डचा वापर करु शकतो. याद्वारे अगदी काही सेंकदात तुमचे  व्हर्च्यूअल कार्ड अप्रूव्ह होऊन वापरासाठी ऑनलाईन उपलब्ध होते. वापरकर्ते या व्हर्च्यूअल कार्डच्या मदतीने क्रिप्टो करन्सी एटीएममध्ये कॅश मिळवू शकतील. आणि रिटेल स्टोर मध्ये ते खर्च देखील करु शकतील. सध्यातरी ही सोय फक्त अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी आहे. सुप्रसिध्द अमेरिकन कंपनी टेस्लाने देखील घोषणा केली आहे की त्यांची इलेक्ट्रीक कार विकत घेण्यासाठी बिटकॉईन स्विकारले जातील. टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे क्रिप्टो करन्सीला त्यांच्या सोशल मिडीयावर प्रमोट करताना दिसतायत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com