आता पांढरे केस विसरा; ही गोष्ट वापरून करा घरच्या घरी केस काळे...

now color your hairs by using tea powder read full story
now color your hairs by using tea powder read full story

नागपूर : केस हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. अनेक जणांना आपले केस प्राणांपेक्षाही प्रिय असतात. केसांमुळे महिलांची सुंदरता अधिक वाढते. बरेच पुरुष आणि तरुण मुलं-मुली निरनिरळ्या प्रकारच्या हेअर स्टाईल्स करतात. अर्थात हे सगळं ज्यांचे केस सुस्थितीत आणि घनदाट आहेत त्यांनाच शक्‍य असते. मात्र, ज्यांचे केस गळाले आहेत किंवा पांढरे झाले आहेत त्यांच काय? चला तर जाणून घेऊया त्यांच्यासाठी काय आहे उपाय... 

लोकं आपल्या केसांना जपण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे महागडे क्रीम्स, तेल, सिरम आणि शॅम्पू लावतात. इतकंच नाही तर सलूनमध्ये जाऊन केसांवर अनेक प्रकारच्या प्रक्रिया करतात. तरुण पिढीमध्ये तर आजकाल केसाला निरनिराळ्या प्रकारचे पिवळे आणि लाल कलर लावण्याची फॅशन आली आहे. पण, ज्यांचे केस कुठलाही कलर न लावता वयानुसार किंवा कमी वयातच पांढरे होतात त्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 

कमी वयात केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे असंतुलित आहार. त्याचबरोबर हवेतील वाढत्या प्रदूषणामुळेही अनेक तरुण मुला-मुलींचे केस पांढरे होतात. त्यामुळे त्यांना कमी वयातच हेअर डाय लावण्याची वेळ येते. मात्र, हेअर डायमुळे केस काळे करण्याच्या नादात अनेकांचे केस गळू लागतात किंवा त्याचे साईड इफेक्‍ट्‌सही होतात. मात्र, आता चिंता करू नका... घरच्या घरी कुठलंही डाय न लावता केस काळे करण्याचा एक अनोखा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आता डाय लावू नका
 
अनेकांसाठी डाय लावणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी असते. यामुळे अनेकजण कंटाळाही करतात. त्यात बाजारात डायची किंमतही बरीच आहे. पण, आता आपल्या दैनंदिन वापरातील एका महत्त्वाच्या गोष्टीचा वापर करून तुम्ही तुमचे केस काळे करू शकणार आहात. त्यामुळे आता डाय विसरून जा... 

या गोष्टीचा करा वापर

चहा पित नाही असा कोणी शोधूनही सापडणार नाही. चहा झाल्यानंतर आपण चहा पावडर काही कामाची नाही म्हणून फेकून देतो. पण, आता हीच चहा पावडर तुमचे केस काळे करण्यात कामात येणार आहे. त्यामुळे आता उरलेली चहा पावडर फेकू नका त्याचा वापर करा. 

चहाच्या या गुणांमुळे होतात केस काळे
 
चहा पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात टॅनिक ऍसिड असते. ज्यामुळे काही वेळातच पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही चहा पावडरमध्ये पाणी मिक्‍स करून पांढरे केस काळे करू शकता. 

ही आहे पद्धत 

  • एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या. 
  • त्यात 10 चमचे चहा पावडर घाला. 
  • मध्यम आचेवर हे पाणी चांगल उकळवा. 
  • त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या. 
  • हे पाणी थंड झाल्यावर केसाच्या मुळाशी लावा. त्यासाठी ब्रशचा वापर करा. 
  • आंघोळीच्या 30 मिनिटांआधी हे पाणी केसाला लावा. 
  • त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

घरच्या घरी तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. तेही कुठलंही डाय न वापरता. यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्‍ट्‌सही होणार नाहीत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com